"दादर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३१:
१८९९- १९०० दरम्यान दादर- माटुंगा- वडाळा-शिव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९० च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने एक विकास योजना तयार केली जेणेकरून मुख्य शहरा मधील गजबजाट कमी करता यावा. त्यावेळी करण्यात आलेल्या परीक्षणा प्रमाणे दादर माटुंगा परिसरात ६०,००० च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा शिव परिसरात आणि ८५,००० च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते.
 
योजने प्रमाणे बांधकामांनाबांधकामांस सुरवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवाशी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारती सुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठी हि जागा राखून ठेवण्यात आली होती.
 
जवळजवळ ४४० एकर (१.८ चौ.किमी ) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/दादर" पासून हुडकले