"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७७:
'''कथं प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथं बाह्यमभिधत्ते कथमध्यात्ममिति ॥१॥'''

नंतर पिप्पलाद मुनींना कोसल देशातील आश्वलायन याने विचारले - 'भगवन, हा प्राण कुठून उत्पन्न होतो? या शरीरात तो कसा येतो? स्वःताचे विभाग करून कसा राहतो? कशा प्रकारे तो निघून जातो? बाह्य जगाला कसे धारण करतो (व्यवस्थित ठेवतो)? आणि शरीरांतर्गत व्यवस्था कशा प्रकारे नीट ठेवतो? ॥१॥

'''तस्मै स होवाचातिप्रश्चान् पॄच्छसि ब्रम्हिष्ठोऽसीति तस्मात्तेऽहं ब्रवीमि ॥२'''
Line १८६ ⟶ १८३:
'''आत्मन एष प्राणो जायते । यथैषा पुरूषे छायैतस्मिन्नेतदातं मनोकृतेनायात्यस्मिञ्शरीरे ॥३॥'''

त्याला पिप्पलाद म्हणाले, ' तू फारच खोल प्रश्न विचारतो आहेस. पण तू ब्रह्मनिष्ठ आहेस म्हणून मी तुला सांगतो. हा प्राण आत्म्यापासून उत्पन्न होतो. पुरूषाची सावली जशी त्याच्यातच असते त्याचप्रमाणे हा प्राण आत्म्याच्या ठिकाणी आश्रित असतो आणि या शरीरात तो मनाने केलेल्या इच्छेने, संकल्पाने प्रवेश करतो. (अर्थात मनुष्याच्या संकल्पानुसार त्याला शरीर प्राप्त होते.) ॥२,३॥

'''यथा सम्रादेवाधिकृतान् विनियुङ्त्क्ते ।'''
Line १९४ ⟶ १८९:
'''एतन् ग्रामानोतान् ग्रामानधितिष्टस्वेत्येवमेवैष प्राण इतरान् प्राणान् पृथक पृथगेव सन्निधत्ते ॥४॥'''

एखादा सम्राट ज्याप्रमाने ' अमुक इतक्या गावांचा तू अधिकारी, अमुक दुसऱ्या काही गावांचा हा दुसरा माणूस अधिकारी होईल' या प्रमाणे विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो त्याप्रमाणे हा प्राण, अपान आदि इतर प्राणांना वेगवेगळे काम आणि स्थान नेमून देतो. ॥४॥

'''पायूपस्थेऽपानं चक्षुःश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रातिष्टते मध्ये तु समानः ।'''
Line २०२ ⟶ १९५:
'''एष ह्येतद्धुतमन्नं समं नयति तस्मादेताः सप्तार्चिषो भवन्ति ॥ ५ ॥'''

गुदद्वार आणि त्याजवळचे लिंग याठिकाणी तो अपानाला प्रस्थापित करतो. नेत्र, कान, मुख आणि नाक याठिकाणी तो प्राण स्वतः स्थित असतो आणि शरीराच्या मध्यवर्ती स्थानात तो 'समान' वायूला स्थापतो. तो समान वायूच खाल्लेले अन्न सर्वत्र समत्वाने पोहोचवतो. या प्राणामुळेच सात प्रकाशमय ज्योती उत्पन्न होतात. (२ डोळे + २ कान + २ नाकपुड्या + १ मुख) ॥५॥

'''हृदि ह्येष आत्मा ।'''
Line २१० ⟶ २०२:

हा प्रसिद्ध आत्मा हदयस्थानी राहतो. तेथे एक शत नाड्या आहेत. त्या एकेका नाडीला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्त्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायू ज्या नाड्यात संचारतो त्या मज्जासंस्थेचा ज्ञानतंतू आणि क्रियासंदेशवाहक तंतू (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहीन्या (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्त्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.)

'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''

आणि एका नाडीने उदान वायू शरीरातील वरच्या भागात संचरतो. पुण्यकारक कर्मे करणाऱ्या जीवात्म्याला तोच पुण्यमय उच्च लोकात (स्वर्ग) नेतो आणि पापमय कर्मे जास्त करणाऱ्या जीवात्म्याला मनुष्यामध्ये हीन अशा योनीत नेतो. पुण्य आणि पाप समान असतील त्यांना हा वायु पुन्हा मनुष्यलोकातच जन्म प्राप्त करून देतो. ॥७॥

'''आदित्यो ह वै बाह्यः प्राण उदयत्येष ह्येनं चाक्षुषं प्राणमनुगृह्णानः ।'''
Line २२४ ⟶ २१२:
'''पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्यान्तरा यदाकाशः स समानो वायुर्व्यानः ॥ ८ ॥'''

खरोखर सूर्य हाच बाह्य जगातील प्राण आहे. तो नेत्रातील प्राण शक्तीवर (अनुग्रह करणारा असा) उदय पावतो. त्यामुळे नेत्रांना पाहण्याची शक्ती येते. पृथ्वीमध्ये जी देवता आहे ती मनुष्याच्या अपान वायूला त्याच्या जागी स्थिर करते. आकाश या महाभूताच्या ठिकाणी 'समान' वायू असतो आणि व्यान वायू हाच बाह्य जगातील 'व्यान' होय. सूर्य नेत्रांच्या ठिकाणी, पृथ्वी गुदद्वार आणि लिंग, नाभीच्या खालचा बस्तीभाग याठिकाणी, आकाश सर्व जठर, आंत्र आदि 'धड' यासर्व सर्व बाह्य अवयवांच्या ठिकाणी, वायू हा सर्व शरीरभर, अंतर्भागात आधारभूत होतात. ॥८॥

'''तेजो ह वा उदानस्तस्मादुपशान्ततेजाः । पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पध्यमानैः ॥ ९ ॥'''

सूर्य आणि अग्नी यांचे जे तेजोमय बाह्य शरीर आहे, तोच बाह्य जगतातील उदान वायू आहे. तो शरीराच्या बाह्यांगाला उष्ण ठॆवतो आणि अंतरंगातही उष्णता कायम राखतो. जेव्हा उदान वायू शरीरातून निघून जातो तेव्हा मनासहित इंद्रियेही शरीरात उष्णता न राहिल्यामुळे उदानाबरोबर शरीर सोडून जातात आणि दुसऱ्या शरीराचा आश्रय घेतात. हाच पुनर्जन्म होय. ॥९॥

'''यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति । प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना तथासङ्कल्पितं लोकं नयति ॥ १० ॥'''

जीवात्मा ज्या प्रकारचा संकल्प चित्तात वागवीत असतो त्या संकल्पाला, उदान वायू बरोबर प्राणात स्थिर राहून आपल्या बरोबर मन आणि इंद्रिये घेऊन गमन करतो. अर्थात उदान आणि प्राण यांसह जीवात्मा वासनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे भिन्न-भिन्न लोकी जातो. ॥१०॥

'''य एवं विद्वान् प्राणं वेद न हास्य प्रजा हीयतेऽमृतो भवति तदेषः श्लोकः ॥ ११ ॥'''

जो कोणी ज्ञानी प्राणाचे असे स्वरूप आणि गुणधर्म जाणतो (सदाचार आणि सद्वासना यांचा अवलंब करतो) त्याची संतती नष्ट होत नाही, त्यांच्या संततीची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. हे स्पष्ट करणारा श्लोक पुढीलप्रमाणे आहे. ॥११॥

'''उत्पत्तिमायतिं स्थानं विभुत्वं चैव पञ्चधा ।'''
Line २४९ ⟶ २३०:
'''अध्यात्मं चैव प्राणस्य विज्ञायामृतमश्नुते विज्ञायामृतमश्नुत इति ॥ १२ ॥'''

जो प्राणाची उत्पत्ती, त्याचा शरीरातील प्रवेश, त्याचे बाह्य जगतातील पाच प्रकारचे अस्तित्व आणि शरीरातील (त्याचे) पाच प्रकारचे कार्य आणि व्यापकता जाणतो तो त्या ज्ञानाने अमृतच सेवन करतो, परमानन्दमय अविनाशी परब्रम्ह परमेश्वराशी तद्रूप होऊन मुक्तीतच निरन्तर अमरत्वाने राहतो. तो अमृत सेवन करतो. (हे निश्चित म्हणून दोनदा सांगितले आहे.) ॥१२॥

'''इति प्रश्नोपनिषदि तृतीयः प्रश्नः ॥'''

==चतुर्थ प्रश्न==