"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १२:
 
==अभयारण्याविषयी माहिती==
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे [['''[[शेकरू]]''']][['''[[हरियाल]]''']] पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.
 
चांदोली राष्ट्रीय उद्यान [[सांगली]], [[सातारा]], [[कोल्हापूर]] व [[रत्नागिरी]] या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वात मोठे [[अभयारण्य]] आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणीगणना मे महिन्यात दोन टप्प्यात करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडात विभागणी केली आहे. प्राणी गणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटावरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्‍चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्‍चित केली जाते. ठश्‍यांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्‍चिती केली जाते.