"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
या वेळी मराठ्यांनी दुसरेहि एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स्. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाजीउद्दीन याने वजिराचे पद् बळकावून दुसरा अलमगीर यास तत्त्कावर बसविले. त्या वेळी अलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाअलम या नावाने प्रसिध्द होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करुन अलाहाबादेस ठाणे दिले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तक्तावर बसविले.
 
'''त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी''' = इ.स. १७६५ मध्ये [[मल्हारराव होळकर]] मरण पावला. तेव्हा त्याची सून [[अहिल्याबाई होळकर]] ही जहागिरीची व्यवस्था पाहू लागली. तिचा कारभार तिच्या प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे तिचे नाव उत्तर हिन्दुस्थानात अजून सर्वत्रांच्या तोंडी आहे.
 
दुसरी गोष्ट म्हणजे [महादजी शिंदे|महादजी शिंद्यांची]] दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय.
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.