"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==श्री सिध्दारुढ स्वामी== हे एक ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मज्ञानी असे महान ...
(काही फरक नाही)

१४:४०, २७ जुलै २००९ ची आवृत्ती

श्री सिध्दारुढ स्वामी

हे एक ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मज्ञानी असे महान संत होऊन गेले. कर्नाटकातील हुबळी ह्या शहरी त्यांचा मोठा आश्रम (सिध्दाश्रम) तसेच त्यांची समाधि आहे. गुरुशांतप्पा (वडिल) आणि देवमल्लम्मा (आई)(काही लोक फक्त मल्लम्मा असे सुध्दा म्हणतात)ह्या अत्यंत पापभीरु, देवभक्त आणि धार्मिक आचरण करणार्‍या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इ.स. १८३६ साली चलकापूर (जिल्हा: बीदर) ह्या गावी कर्नाटकात झाला (श्री सिध्दारुढ स्वामींचे एक प्रख्यात शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या "श्री सिध्दारुढ कथामृत" मध्ये स्वामी निजामाच्या राज्यातील वंशदुर्ग ह्या ठिकाणी शके १७५८ मध्ये जन्मले होते).