"श्री गोविन्दाष्टकम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राड्गणरिड्गणलोलमनायासं परमायासम् |'''
'''मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्माया नाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ||१||'''
 
जो सत्यस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे, (विश्वात सर्वकाळ सर्वत्र सर्व पदार्थांच्या रूपाने व्याप्त असल्याने ज्याच्या स्वरूपाचा अन्त लागत नाही म्हणून) जो अनन्त आहे, (कधीही नाश होत नाही म्हणून) जो नित्य आहे, (आकाशादि पंचमहाभूते ज्याच्या स्वरूपात सामावलेली असल्याने) जो आकाशाहून भिन्न आहे, तथापि तो परमाकाश म्हणजे महाकाश किंवा चिदाकाश स्वरूप आहे, आकाशापेक्षाही मोठा आहे, दुसऱ्या कोणत्याही तत्त्वात समाविष्ट नसल्याने अनाकाश आहे, जो गोकुळाच्या अंगणात रांगण्यामध्ये अत्यंत चपळ आहे, जे अनन्य भक्त आहेत त्यांना ज्याच्या प्राप्तीसाठी काही आयास (कष्ट) पडत नाहीत; ज्याला काही परिश्रम नाहीत तरीपण जो फार थकल्यासारखा दिसतो, तत्त्वतः ज्याला काही आकार नाही पण मायेने ज्याने अनेक आकार कल्पून धारण केले आहेत, जो विश्वाच्या आकाराने नटला आहे, जो संपूर्ण पृथ्वीचा आणि लक्ष्मीचा अधिपती (नाथ) असूनही अनाथ आहे (म्हणजे ज्याचा कोणीच अधिपती नाही) अशा आनन्दस्वरूप गोविन्दाला प्रणाम करा. ॥१॥
 
'''मृत्स्नामत्सीहेती यशोदाताडनशैशवसंत्रासं व्यादितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिम् ।'''
'''लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥२॥'''
 
"अरे ! तू माती खातोस काय?' असे विचारणारी यशोदा माता आता आपल्याला मार देईल असे समजून बालस्वरूपाला अनुरूप अशा भावाने जो घाबरलेला आहे, 'आई ! मी माती नाही ग खाल्ली, पाहा माझे तोंड !' असे बोलून "आ" करून आपल्या मुखात यशोदेला लोकालोक पर्वतांसह चौदा भुवने दाखवित आहे, जो त्रैलोक्यरूपी नगराचा आधारस्तंभ आहे, जो सर्व लोकांना प्रकाशित करतो पण ज्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, त्या सर्व लोकाधिपतीला, परमानंदस्वरूप असलेल्या गोविन्दाला प्रणाम करा. ॥२॥