"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भयादी आणि तळटीपा
ओळ ६८:
मुख्य लेख: [[इस्पानिया]]
 
[[दुसरे प्युनिक युद्ध|दुसर्‍या प्युनिक युद्धादरम्यान]] (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यालगत असणार्‍या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते.<ref name="hispania">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = A History of Spain and Portugal; Ch. 1 Ancient Hispania |publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref> मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.<ref name="country">{{cite web |last=Rinehart |first=Robert |coauthors=Seeley, Jo Ann Browning | title = A Country Study: Spain - Hispania |publisher=Library of Congress Country Series |date=1998 |url=http://lcweb2.loc.gov/frd/cs/estoc.html |accessdate=2008-08-09}}</ref><ref group="टीप"> रोमन अभिजन वर्गाकडून पाळली जाणारी जमीन मालकीची पद्धत ([[लातिफुन्दिया]]) तत्कालीन इबेरियन जमीन मालकीच्या पद्धती ऐवजी वापरली जाऊ लागली.</ref>
 
 
ओळ ७४:
रोमनांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या [[लिस्बन]](''Olissis bona ओलिसिस बोना''), [[तारागोना]](''Tarraco ताराको'') या शहरांचा विकास केला तसेच अनेक नवीन शहरे देखील वसवली. उदा.:[[झारागोझा]](''Caesaraugusta सेयासाराउगुस्ता''), [[मेरिदा]](''Augusta Emerita औगुस्ता एमेरिता''), [[वालेन्सिया]](''Valentia'' वालेन्तिया), [[लेओन]](''Legio Septima लेजिओ सेप्तिमा''), [[बादाखोस]](''Pax Augusta पाक्स औगुस्ता''), आणि [[पालेन्सिया]]("Παλλαντία Pallas" ''Ateneia पालास आतेनेइया'').
 
रोमान अंमलाखाली या प्रांताची अर्थव्यवस्था भरभराटीस आली. [[इस्पानिया]] म्हणून ओळखला जाणार्‍या ह्या प्रांताची रोमन साम्राज्याचे धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण झाली. या प्रांताच्या बंदरांमधून [[सोने]], [[लोकर]], [[ऑलिव्ह तेल]], आणि [[वाईन]] यांची निर्यात सुरू झाली. कालवे व सिंचन प्रकल्पांमुळे या प्रदेशातील कृषी उत्पादन वाढले; यातील काही आजही अस्तित्वात आहेत. [[सम्राट त्राहान]], [[सम्राट थिओडोसियस पहिला]] व तत्ववेत्ता [[सेनेका]] यांचा; तसेच [[मार्तियाल]], [[किंतिलियान]] आणि [[लुकान]] या कवींचा जन्म इस्पानियात झाला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला आणि त्याला दुसर्‍या शतकाखेरीस लोकप्रियता मिळाली.<ref name="country"/> वर्तमान स्पेनमधल्या भाषा, धर्म, परंपरा आणि कायदे यांचा उगम या काळात शोधता येऊ शकेल.<ref name="hispania"/>
 
रोमन साम्राज्याच्या अस्ताला सुरूवात झाल्यानंतर, जर्मेनिक रानटी टोळ्यांनी ५व्या शतकात इस्पानियावर हल्ले करण्यास प्रारंभ केला. [[व्हिसिगॉथ]], [[सुएबि]], [[व्हॅन्डल]] आणि [[अलन]] या टोळ्या पिरेनिस पर्वत ओलांडून स्पेनमध्ये आल्या. रोमनीकरण झालेले व्हिसिगॉथ इ.स.४१५ मध्ये स्पेनमधे आले. या एकाधिकारशाहीने रोमन कॅथोलिक धर्म स्वीकारल्यानंतर ईशान्येस विखुरलेले सुएबि टोळ्यांचे आणि आग्नेयेस विखुरलेले [[बायझन्टाईन]] साम्राज्यातले प्रदेश जिंकून इबेरिया द्वीपकल्पाच्या बर्‍याच मोठ्या भागावर ताबा मिळवला.
ओळ ८२:
मुख्य लेख: [[अल्-अंदालुस]]
 
आठव्या शतकात सन ७११ ते सन ७१८ दरम्यान उत्तर आफ्रिकेतील [[बर्बर]] अथवा [[मूर]] जातीच्या अरबांनी जवळजवळ संपूर्ण इबेरिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला. [[उमय्याद घराणे|उमय्याद घराण्याच्या]] अरब साम्राज्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. केवळ उत्तरेच्या डोंगराळ प्रदेशातील काही छोटी राज्ये स्वतंत्र राहिली.<ref group="टीप">[[इ.स. ७३२]]पर्यंत बर्बर सैन्याची आगेकूच उत्तरेकडे सुरू राहिली आणि शेवटी मध्य फ्रान्समधल्या तोर्स येथील युद्धात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.</ref> कुराणात उल्लेख असलेले लोक म्हणून ख्रिश्चन आणि यहुदी धर्मियांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली, मात्र मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले.<ref>{{cite web|url=http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/anti-semitism/Jews_in_Arab_lands_(gen).html|title=The Treatment of Jews in Arab/Islamic Countries|accessdate=2008-08-13}} आणि: {{cite web|url=http://www.theforgottenrefugees.com/index.php?option=com_content&task=view&id=66&Itemid=39|title=The Forgotten Refugees|accessdate=2008-08-13}}</ref><ref>{{cite web|url=http://www.myjewishlearning.com/history_community/Medieval/IntergroupTO/JewishMuslim/Almohads.htm|title=The Almohads|accessdate=2008-08-13}}</ref>दरम्यान धर्मांतराचे प्रमाणही हळूहळू वाढत राहिले. १० व्या आणि ११ व्या शतकातल्या अनेक सामुहिक धर्मांतरांमुळे एक वेळ अशीही आली की मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त झाली.<ref name="chap2">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = A History of Spain and Portugal; Ch. 2 Al-Andalus |publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref>
 
[[चित्र:कोर्दोबा_मशीद_स्पेन.jpg|thumb|left|175px|[[कोर्दोबा]] येथील [[माझ्कीता]] मशीदीचा अंतर्भाग. स्पेनच्या एकत्रीकरणानंतर हिचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले.]]
खुद्द इबेरियातला मुस्लिम समाजही दुभंगलेल्या अवस्थेत होता आणि या समाजात सामाजिक तेढही होती. ज्यांनी इबेरियावर हल्ल्यासाठी सैन्य पुरवले त्या उत्तर आफ्रिकेतल्या मूर लोकांचे मध्यपूर्वेतल्या अरब सत्ताधीशांशी खटके उडत होते.<ref group="टीप">उत्तर स्पेनमधला ''मध्य मेसेता'' हा भाग अरबांनी बर्बरांना राहण्यासाठी दिला होता. बर्बरांनी पुढे या राहण्यास अवघड असलेल्या भागात स्थायिक होण्याचे प्रयत्न सोडून दिले.</ref> पुढे मूर लोकांची संख्या वाढल्यावर ग्वादाल्किविर नदीचे खोरे, वालेन्सिया येथील किनारी मैदानी प्रदेश आणि ग्रानादाचा डोंगराळ भाग येथे त्यांची सत्ता स्थापन झाली.<ref name="chap2"/>
 
 
स्पेनमधल्या मुस्लिम [[कोर्दोबा खलिफत|खलिफतीची]] [[कोर्दोबा]] ही राजधानी होती. [[मध्ययुगीन युरोप|मध्ययुगीन युरोपातले]] हे सर्वात मोठे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुसंस्कृत शहर होते. भूमध्य समुद्रामार्गे होणारा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला या काळात बहर आला. मध्यपूर्वेतल्या व उत्तर आफ्रिकेतल्या बौद्धिक संपन्नतेची अरबांनी या प्रदेशास ओळख करून दिली. या काळात अभिजात [[ग्रीक संस्कृती]]चे पश्चिम युरोपमध्ये पुनरुज्जीवन करण्यात यहुदी आणि मुस्लिम विद्वानांनी महत्त्वाचे योगदान दिले. रोमन, यहुदी आणि मुस्लिम संस्कृतींमधल्या परस्पर देवाणघेवाणीमुळे या प्रदेशाची स्वत:ची एक विशिष्ट संस्कृती उदयास आली. या काळात लोकसंख्येचा मोठा भाग शहरांबाहेर गावांमध्ये रहात होता. रोमन काळातले जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे नियम या काळातही चालू राहिले. अरब सत्ताधीशांनी जमिनीचे मालकी हक्क मान्य केल्यामुळे व नवीन पिके आणि नवीन शेतीच्या पद्धती आणल्यामुळे शेतीच्या विकासात आणि धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्पेन" पासून हुडकले