"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३७:
 
समुद्राजवळ असल्याने अत्यंत दमट हवा वर्षभर असते. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजे जुन ते सप्टेंबर मध्ये प्रचंड पाउस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश से मध्ये असते. हिवाळा नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.
 
==प्राणी जगत==
 
सुंदरबन चे सर्वात वैशिठ्य आहे येथील वाघांची संख्या भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करुन वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खार्‍यापाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात. काही भ्क्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.
 
वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ व बाराशिंगा ही हरीणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खुर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत व दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात.
 
सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर अनेक विषारी साप नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप तसेच इतर सरपटणार्‍या प्रजाती उदा: घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे तसेच काही जमीनीवरील कासवे येथे आढळतात.
 
पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो.