"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४:
 
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।':
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ. स. १०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२ होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे<ref>Sakal news 18th April 08 http://www.esakal.com/esakal/04182008/Specialnews3001EC8B53.htm</ref>. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.
 
[[Image:Marathispeak.png|thumb|200px|मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश निळ्या रंगात दर्शविलेला आहे]]