"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ८९:
मंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
 
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा ‘युवा महेश’ नावाचा नाट्य ग्रूपग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
 
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्यांचेही निधन झाले. मोहन जोशी हेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके येणे बंद झाले. दूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होऊनही त्यात अनेक उणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक अस्तात.
ओळ ११७:
संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर या तमाशा मंडळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर नेले आहे. कांताबाई सातारकर या हाडाच्या कलावंत आहेत तर चिरंजीव रघुवीर उत्तम विनोदी अभिनेता आहे. दोघांनीही कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे. मंदाराणी, अलका या नृत्य निपुण कलावंत आहेत. चित्रपटात अनेक संधी चालून आल्या असतानाही त्यांनी रंगमंचाची सेवा सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पारंपरिक तमाशाची कला टिकवून ठेवली आहे.
 
संगीत, चित्रकला, शिल्प या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रेसर होते. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर काम करून आपला ठसा उमटवला आहे. त्या काळात उमाजी पेंटर यांनी प्रभातच्या गोकुळचा चोर या सिनेमासाठी सेटचे काम केल्याचा उल्लेख सापडतो. या परंपरेचा आजचा दुवा म्हणजे कांचनकुमार बंदावणे व रूपालीरुपाली बंदावणे. हे दोघेही संगमनेरचे कलावंत आजमितीला हिंदी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. अनेक नावाजलेले सिनेमा व लाईव्ह शो त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम (सौमित्र) हे संगमनेर तालुक्यातील तळेगावचे. तर जवळेकडलगचा नृत्यकार संतोष कडलग हा झी मराठीच्या ‘एकापेक्षा एक’ या नृत्य स्पर्धेत सेकंड विनर होता. ई टी.व्ही.च्या ‘हल्ला बोल’मधेही तो सहभागी होता. गौरव गुंजाळ या कलावंतानेही ई.टी. व्ही.च्या डब्बा गोल, व झी टोकीजच्या कॉमेडी ॲवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. आजही २०१७ साली संगमनेरचे अनेक कलावंत दृशव्य माध्यमाच्या मायावी दुनियेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले