"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Link Spamming/Promotional Links/Self Published Links
खूणपताका: उलटविले
छो nobots साचा टाकला
ओळ १:
{{nobots}}
{{विक्शनरीसूचीविहार}}
वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला '''क्रियापद''' असे म्हणतात.
उदा.
गाय दूध देते.
Line १३२ ⟶ १३३:
आज दिवसभर सारखे गडगडते.

क्रियापद ही संज्ञा विविध अर्थांनी वापरण्यात येते. व्याकरणरचनेच्या विविध परंपरांत क्रियापद ह्या संज्ञेची विविध लक्षणे दिलेली आढळतात. ह्यांपैकी काही लक्षणे लोकव्यवहारातही रुळलेली आहेत. एका प्रकारच्या [[व्याकरण|व्याकरणाच्या]] नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक [[शब्द]]. "श्याम '''खातो'''" यात '''खातो''' हे क्रियापद आहे. त्यातला मूळ धातू '''खा''' हा आहे. मराठीतील सर्व धातू ’णे’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे '''खा''' हा धातू शब्दकोशात '''खाणे''' असा दाखविला जातो.

असे असले तरी सर्वच क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. उदा० सोने पिवळे असते. त्याला फार आनंद झाला. या वाक्यांतले ’असते’ आणि ’झाला’ ही अनुक्रमे ’असणे’ आणि ’होणे’ या धातूंपासून बनलेली क्रियापदे आहेत. परंतु ही क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. त्यामुळे ’क्रियापदा’ची वेगळी व्याख्या करणे जरुरीचे आहे. अर्थाच्या आधाराने ती करणे तितकेसे सोपे नाही. मात्र क्रियापदाची दोन लक्षणे नक्की आहेत. पहिले क्रियाबोधकत्व आणि दुसरे वाक्यपूरकत्व. वाक्यात क्रियापद म्हणून आलेला शब्द काही तरी विधान करतो, आणि वाक्य पूर्ण करतो. क्रियापद क्रियेचा बोध करीत असल्याने तो शब्द काळाचाही बोध करतो. आज्ञार्थक आणि संकेतार्थक क्रियापदे काळाबरोबर अर्थाचाही बोध करतात.

रूपनिष्ठ व्याकरणाची तांत्रिक परिभाषा लक्षात घेतली असता क्रियापद ह्या शब्दाला एक विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे. वाक्याची फोड ही पदांत होते. ह्या पदांपैकी विशिष्ट तऱ्हेचे म्हणजे काळ (वर्तमान, भूत, भविष्य) आणि अर्थ (आज्ञा, विधि इ.) दार्शवणारे प्रत्यय लागलेले शब्द म्हणजे धातू. उदा. खा ह्या धातूला तो हा वर्तमानकालवाचक प्रत्यय लागला की खातो हे क्रियापद बनते. ह्या लक्षणात धातूचा अर्थ क्रिया हा असतो असे म्हटलेले नाही. त्यामुळे अस, हो इ. सामान्य अर्थी क्रियावाचक नसलेले शब्दही धातू ठरतात. कारण त्यांना विशिष्ट प्रत्यय लागतात.

==मराठीत क्रियापदांचे प्रकार==
मराठीत क्रियापदांचे तीन प्रकार आहेत. [[#सकर्मक क्रियापदे|सकर्मक]], [[#अकर्मक क्रियापदे |अकर्मक]] आणि [[#संयुक्त क्रियापद|संयुक्त]].

===सकर्मक क्रियापदे===
* सकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या [[वाक्य|वाक्यांचे]] अर्थ पूर्ण होण्यासाठी, अधिक कळण्यासाठी [[कर्म, व्याकरण|कर्माची]] गरज असते, ती क्रियापदे.

** उदा० वाचणे, लिहिणे, पाहणे इ.

ओळ १५५:
राम आंबा खातो - राम चिंच खातो - राम बोर खातो

सीता आंबा खाते - सीता चिंच खाते - सीता बोर खाते

पाखरू आंबा खाते - पाखरू चिंच खाते - पाखरू बोर खाते

राम आंबे खातो - राम चिंचा खातो - राम बोरे खातो

सीता आंबे खाते - सीता चिंचा खाते - सीता बोरे खाते

पाखरू आंबे खाते - पाखरू चिंचा खाते - पाखरू बोरे खाते

राम आणि लक्ष्मण आंबा खातात - राम आणि लक्ष्मण चिंच खातात - राम आणि लक्ष्मण बोर खातात

सीता आणि ऊर्मिला आंबा खातात - राम आणि लक्ष्मण चिंच खातात - सीता आणि ऊर्मिला बोर खातात

पाखरे आंबा खातात - पाखरे चिंच खातात - पाखरे बोर खातात

राम आणि लक्ष्मण आंबे खातात - राम आणि लक्ष्मण चिंचा खातात - राम आणि लक्ष्मण बोरे खातात

सीता आणि ऊर्मिला आंबे खातात - राम आणि लक्ष्मण चिंचा खातात - सीता आणि ऊर्मिला बोरे खातात

पाखरे आंबे खातात - पाखरे चिंचा खातात - पाखरे बोरे खातात

====भूतकाळ====
ओळ १७३:
रामाने आंबा खाल्ला - रामाने चिंच खाल्ली - रामाने बोर खाल्ले

सीतेने आंबा खाल्ला - सीतेने चिंच खाल्ली - सीतेने बोर खाल्ले

पाखराने आंबा खाल्ला - पाखराने चिंच खाल्ली - पाखराने बोर खाल्ले

रामाने आंबे खाल्ले- रामाने चिंचा खाल्ल्या -रामाने बोरे खाल्ली

सीतेने आंबे खाल्ले - सीतेने चिंचा खाल्ल्या - सीतेने बोरे खाल्ली

पाखराने आंबे खाल्ले - पाखराने चिंचा खाल्ल्या - पाखराने बोरे खाल्ली

राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबा खाल्ला - राम आणि लक्षमण ह्यांनी चिंच खाल्ली - राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोर खाल्ले

सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबा खाल्ला - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंच खाल्ली - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोर खाल्ले

पाखरांनी आंबा खाल्ला - पाखरांनी चिंच खाल्ली - पाखरांनी बोर खाल्ले

राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबे खाल्ले - राम आणि लक्षमण ह्यांनी चिंचा खाल्ल्या - राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोरे खाल्ली

सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबे खाल्ले - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंचा खाल्ल्या - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोरे खाल्ली

पाखरांनी आंबे खाल्ले - पाखरांनी चिंचा खाल्ल्या - पाखरांनी बोरे खाल्ली.

====भविष्यकाळ====
ओळ १९१:
राम आंबा खाईल - राम चिंच खाईल - राम बोर खाईल

सीता आंबा खाईल - सीता चिंच खाईल - सीता बोर खाईल

पाखरू आंबा खाईल - पाखरू चिंच खाईल - पाखरू बोर खाईल

राम आंबे खाईल - राम चिंचा खाईल - राम बोरे खाईल

सीता आंबे खाईल - सीता चिंचा खाईल - सीता बोरे खाईल

पाखरू आंबे खाईल - पाखरू चिंचा खाईल - पाखरू बोरे खाईल

राम आणि लक्ष्मण आंबा खातील - राम आणि लक्ष्मण चिंच खातील - राम आणि लक्ष्मण बोर खातील

सीता आणि ऊर्मिला आंबा खातील - सीता आणि ऊर्मिला चिंच खातील - सीता आणि ऊर्मिला बोर खातील

पाखरे आंबा खातील - पाखरे चिंच खातील - पाखरे बोर खातील

राम आणि लक्ष्मण आंबे खातील - राम आणि लक्ष्मण चिंचा खातील - राम आणि लक्ष्मण बोरे खातील

सीता आणि ऊर्मिला आंबे खातील - सीता आणि ऊर्मिला चिंचा खातील - सीता आणि ऊर्मिला बोरे खातील

पाखरे आंबे खातील - पाखरे चिंचा खातील - पाखरे बोरे खातील

====इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉईस प्रमाणे ====
Line २१० ⟶ २०९:
आंबा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ला ( जातो/गेला/जाईल)

चिंच (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जाते/गेली/जाईल)

बोर (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जाते/गेले/जाईल)

आंबे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जातात/गेले/जातील)

चिंचा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ल्या ( जातात/गेल्या/जातील)

बोरे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जातात/गेली/जातील)

===अकर्मक क्रियापदे ===

* अकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या [[वाक्य|वाक्यांचा]] अर्थ पूर्ण होण्यासाठी [[कर्म, व्याकरण|कर्माची]] गरज नसते, अशी क्रियापदे.
Line २२५ ⟶ २२४:
===संयुक्त क्रियापद ===

* संयुक्त क्रियापदात दोन किवा अधिक क्रियापदे असतात. पैकी एकाचे [[धातुसाधित रूप]] असते.
** उदा. "तो वाचत बसला." यात वाचणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे असली तरी एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून येथे "वाचत बसला" हे संयुक्त क्रियापद होय. तसेच, ''तो वाचता वाचता बसला''. क्रियापद दाखविणारे हे एकाहून अधिक शब्द सुटेसुटे लिहायचे असतात. उदा० जिंकू या, जाऊ दे, करू पाहतो.

** उदा. "तो वाचत बसला." यात वाचणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे असली तरी एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून येथे "वाचत बसला" हे संयुक्त क्रियापद होय. तसेच, ''तो वाचता वाचता बसला''. क्रियापद दाखविणारे हे एकाहून अधिक शब्द सुटेसुटे लिहायचे असतात. उदा० जिंकू या, जाऊ दे, करू पाहतो.

==प्रयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रियापद" पासून हुडकले