"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (2) using AWB
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ ३१:
सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.
 
१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४०च्या१६४० च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.
 
[[चित्र:The Nightwatch by Rembrandt - Rijksmuseum.jpg|thumb|left|300px|'द नाईट वॉच' किंवा 'द मिलीशिया कंपनी ऑफ कॅप्टन बॅनिंग कोक' नावाने ओळखले जाणारे तैलचित्र([[इ.स. १६४२|१६४२]]). हे चित्र सध्या 'रिक्समुझेउम, ऍमस्टरडॅम' येथे आहे.]]
 
१६४० ते १६५०च्या१६५० च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.
 
== प्रमुख चित्रे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रेब्रांट" पासून हुडकले