"महाराष्ट्र टाइम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ४०:
 
==स्थापना==
'महाराष्ट्र टाइम्स'ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली. 'महाराष्ट्र टाइम्स' सुरू करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट कोलमन ॲन्ड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष शांतिप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-</ref> पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात शांतिप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-</ref> यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की," टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल. मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर वृत्तपत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे." ही माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १८ जून १९६२च्या१९६२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.
 
==पहिला अंक==