"जॉर्ज डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ४०:
जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठातून]], तर इ.स. १९७५ साली [[हार्वर्ड बिझनेस स्कूल|हार्वर्ड बिझनेस स्कुलातून]] पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार [[अल गोर]] यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.
 
बुश याच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना [[सप्टेंबर ११, २००१चे२००१ चे दहशतवादी हल्ले|सप्टेंबर ११, इ.स. २००१चे२००१ चे दहशतवादी हल्ले]] झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने ''दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध'' घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानावर]], तर इ.स. २००३ साली [[इराक|इराकावर]] आक्रमण केले. बुश याच्या दुसऱ्या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्याची लोकप्रियता दुसऱ्या मुदतीत ओसरू लागली.
 
== बाह्य दुवे ==