"सुरेश भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणा-या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर [[हृदयनाथ मंगेशकर]] होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि [[विष्णू नारायण भातखंडे]]कृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती.
 
१९५२ ला१९५२ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.
 
==शरीरसाधना आणि खेळ==
ओळ ४१:
 
==शिक्षण आणि काव्यलेखन==
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए. ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
 
त्यांच्या गझला व कविता [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुरेश वाडकर]] आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.<ref>[http://www.samyaksanvad.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-declaration-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/| सुरेश सावंत याच्या मुलाखतीचा अंश]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरेश_भट" पासून हुडकले