"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ ३:
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. समुद्रगुप्ताला अनेक ज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्ताची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती, म्हणून पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.
समुद्रगुप्ताबद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरून मिळते. हे स्तंभ त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्ताच्या विविध मोहिमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकीय स्थिती दर्शवतात, कारण विविध राजे, राज्ये व त्यात राहणाऱ्या लोकांचा त्यांत उल्लेख आहे. समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. त्यांवर परशू ,गरुड ,धनुर्धर, अश्वमेध,व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादि इत्यादी चित्रे आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त: हे नाव कोरलेले आहे......
 
==समुद्रगुप्ताचा साम्राज्यविस्तार==