"इंग्लंडचा पहिला चार्ल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ६:
चार्ल्स आणि संसद ह्या दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी सुरू केली. [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १६४२]]मध्ये चार्ल्स उत्तरेत [[ऑक्सफर्ड]]ला गेला व तिथे त्याने आपला दरबार भरवला. संसद लंडनमध्ये होती व तिने तिथे स्वतंत्र सैन्य उभारायला सुरुवात केली. [[ऑक्टोबर २५]]ला युद्धाला तोंड फुटले, पण [[एजहिलची लढाई|एजहिलच्या लढाईत]] कोणाचीच हार-जीत झाली नाही. [[इ.स. १६४४]] पर्यंत तुरळक लढाया होत राहिल्या. शेवटी [[नेसेबीची लढाई|नेसेबीच्या लढाईत]] संसदेच्या सैन्याने चार्ल्सच्या सैन्याला हरवले आणि चार्ल्स ऑक्सफर्डला पळून गेला. नंतर [[एप्रिल महिना|एप्रिल]] [[इ.स. १६४६]]मध्ये वेढा फोडून तो [[स्कॉटलंड]]ला पळाला व तिथे प्रेझ्बिटीरिअन पंथाच्या सैन्याला शरण गेला. परंतु त्यां सैन्याने चार्ल्सला स्कॉटलंड व इंग्लंडमधल्या युद्धातला मोहरा बनवले आणि युद्ध थांबवण्याच्या बदल्यात त्याला इंग्लिश संसदेकडे सोपवले.
 
पुन्हा एकदा पळून चार्ल्स [[आईल ऑफ राईट]]च्या संसदीय अधिकाऱ्याला शरण गेला. पण त्या अधिकार्याला चार्ल्सबद्दल सहानुभुति नव्हती. पर्यायी चार्ल्स पुन्हा तुरुंगात पडला. [[इ.स. १६४८]]मध्ये संसदेने खास कायदा मंजूर करून चार्ल्सवर खटला केला. 'देवाने आपल्याला राजेपद दिलेले असल्यामुळे कोणतेही न्यायालय आपल्यावर खटलाच करु शकत नाही' असा युक्तिवाद त्यावेळी चार्ल्सने केला. 'न्यायालयासमोर सगळी माणसे सारखीच आहेत' असा संसदेने प्रतिवाद केला. खटल्याचा निकाल चार्ल्सच्या विरुद्ध लागला व त्याला [[मृत्युदंड|मृत्युदंडाची]] शिक्षा झाली. चार्ल्सने माफी मागितल्यास त्याला ती देण्याची तयारी न्यायालयाने दाखवली, पण त्याने मरण पसंत केले. जानेवारी ३०, इ.स. १६४९ ला१६४९ला चार्ल्सला शिरच्छेदाने मृत्युदंड देण्यात आला.
 
[[वर्ग:इंग्लंडचा इतिहास]]