"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४३:
येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते.
 
पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकीर्दीतकारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि ॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्युन्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.
 
गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले