"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १६:
 
==उगम==
आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये [[रत्नागिरीरत्‍नागिरी]] जिल्ह्यातल्या [[हर्णे]] या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ''तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू''.{{संदर्भ हवा}} त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण [[सुवर्णदुर्ग]] या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] पदरी सरदार होते.{{संदर्भ हवा}} कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.
 
१६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना ''दर्यासारंग'' अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.