"श्रीधर महादेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
'''श्रीधर महादेव जोशी''', अर्थात '''एस.एम. जोशी''', (जन्म : १२ नोव्हेंबर १९०४; मृत्य : १ एप्रिल १९८९) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक]], [[समाजवाद|समाजवादी]] कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी [[संयुक्त समाजवादी पक्ष|संयुक्त समाजवादी पक्षाचे]] सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील निःस्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते.
 
एस. एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळीलरत्‍नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणाऱ्या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.
 
एसेएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.