"सिद्धिविनायक (सिद्धटेक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १५:
येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते.पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे.  हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव "सिद्धी-विनायक" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते ..येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते.
 
मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीससुरूवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते..त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले.या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवातसुरूवात केली.. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे.. पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले - "ओम श्री गणेशाय नमः". प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी ("शक्ती") प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते
 
== इतिहास ==