"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
ओळ ३७:
ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ [[मॅक्स व्हॉन लोये]] यांना [[नाझी]] पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.
 
१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" ([[राष्ट्रीय समाजवाद]] आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करून व्यावहारीक युद्ध शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. [[सैध्दांतिकसैद्धांतिक भौतिकशास्त्र]] हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुद्ध जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.
 
ज्यू शास्त्रज्ञांना विशुद्ध नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.