"द.श्री. खटावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
डी.एस,.खटावकर, पूर्ण नाव - दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; मृत्यू :- पुणे, २३ जानेवारी, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते.
 
१९५३मध्ये तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचा "श्रीरामाचा नौकाप्रवास‘ हा पहिला देखावा त्यांनी तयार केली. वेगळा देखावा उभारायचा, हा विचार समोर ठेवूनच सादर केलेल्या या कलाकृतीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर या मंडळाचा देखावा करायचा तर खटावकरांनीच, असा पायंडाही पडला. पुण्यातील या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचेे आणि सजावटीचे काम त्यांनी सलग ५५ वर्षे केले. या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खटावकरांनी सजवलेले कलात्मक आणि नेत्रदीपक रथ हा पुणेकरांचा अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय असे.