"वासुदेव गोपाळ परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1688576 by QueerEcofeminist on 2019-06-23T03:51:42Z
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ४:
'''संशोधक, वेदशास्त्र अभ्यासक'''
 
जन्म : १२ जून १८८७; मृत्यू :- ५ एप्रिल १९७६
 
वासुदेव गोपाळ परांजपे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. त्यांनी १९०६ मध्ये पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून बी.ए. आणि १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. १९११ मध्ये ते एल्एल.बी.झाले. त्यानंतर १९१३ मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत प्रवेश केला. ते त्या संस्थेचे १९१५पासून आजीव सदस्य होते. फर्ग्युसन महाविद्यालयात ते संस्कृत इंग्लिश शिकवत. शासकीय शिष्यवृत्ती घेऊन ते १९२०मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे संशोधनासाठी गेले व तेथे डी.लिट्. झाले. पॅरिस येथे असताना पुढे जे महान प्राच्यविद्या संशोधक ठरले असे सुनीलकुमार चॅटर्जी आणि सुशीलकुमार डे हे त्यांचे समकालीन मित्र होते, तर फ्रान्समधील सिल्हँ लेव्ही हे महान प्राच्यविद्या पंडित त्यांचे मार्गदर्शक होते.