"शैला लोहिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; मृत्यू :- अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.
 
लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर [[बीड]] जिल्ह्यातील [[अंबाजोगाई]]येथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.