"पुरुषोत्तम पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
'''प्रा. पुरुषोत्तम पाटील''' ([[जन्म]] : बहादरपूर - जळगाव जिल्हा, ३ मार्च, [[इ.स. १९२८]]; मृत्यू :- धुळे, १६ जानेवारी, इ.स. २०१७) हे एक [[मराठी]] [[कवी]] आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. ते मूळचे [[अमळनेर]] तालुक्यातील ढेकू या गावचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पुरुषोत्तम पाटलांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर या गावी, आणि नंतरचे अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधे झाले. याच काळात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुढे कॉलेज शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर तेथील समृद्ध वाङ्‌मयीन संस्कृतीमुळे त्यांच्या काव्यलेखनाला अनुकूल वातावरण लाभले.
 
फर्ग्युसन कॉलेजात असताना पाटलांच्या कविता सत्यकथामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी पुढे जनशक्तीमधे उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील शाळांच्या मुख्याधापकाची जबाबदारी स्वीकारली. कला शाखेची पदवी घेतल्यावर ते १९६१मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले.
५१,९४८

संपादने