"वासुदेव गोविंद आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''वासुदेव गोविंद आपटे''' (जन्म : धरणगाव-खानदेश, १२ एप्रिल १८७१; मृत्यू :- पुणे, २ फेब्रुवारी १९३०) हे [[मराठी]] [[लेखक]], भाषांतरकार, [[पत्रकार]], [[आनंद (मासिक)|आनंद मासिकाचे]] संस्थापक व संपादक, [[बंगाली]] [[कथा]]-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. [[कलकत्ता]] विद्यापीठाची बी. ए. परीक्षा सन १८९६मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या [[हिस्लॉप कॉलेज|'हिस्लॉप' कॉलेजात]] एक वर्ष फेलो होते. वा.गॊ. आपटे त्यानंतर पुण्यातही काही काळ शिक्षक होते. [[पुणे]] मुक्कामी त्यांना [[हरि नारायण आपटे]] यांच्या सहवासात मराठी [[भाषा]] व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.{{संदर्भ हवा}}
 
'अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र' (१८९९) हे आपट्यांचे पहिले प्रकाशित [[पुस्तक]]. ते [[कोल्हापूर]]चे प्रोफेसर [[विजापूर]]कर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान [[बुद्ध]] आणि त्याचा [[धर्म]] ह्या विषयावरील 'बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत [[इतिहास]]' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ त्यांनी [[अलाहाबाद]] येथील 'मॉडर्न रिव्ह्यू'त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार [[गोपाळ कृष्ण गोखले]] यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही (२०१८ साली) सुरू असावे. 'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी ''विचारसाधना '' नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला.{{संदर्भ हवा}}