"महादेवशास्त्री जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ४२:
| तळटिपा =
}}
'''महादेवशास्त्री सीताराम जोशी''' (जन्म : आंबेडे [[गोवा]], १२ जानेवारी १९०६; मृत्यू :- १२ डिसेंबर १९९२) हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील लेखक व कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली. यानंतर गोव्यामध्ये 'सत्तरी शिक्षण संस्थे'ची स्थापना करून स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतले. चैतन्य मासिकाचे ते संपादक होते. त्या मासिकातच 'राव्याचे बंड, ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. 'वेलविस्तार' हा त्यांच्या पहिला कथासंग्रह. यानंतर त्यांचे 'खडकातील पाझर', 'विराणी', 'कल्पवृक्ष' मिळून १६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ते गोव्याचे असल्याने गोमंतकीय प्रदेशातल्या चालीरीतींसह जगणाऱ्या चांगल्या वाईट माणसांची जिवंत आणि रसरसीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या काही कथांवर 'कन्यादान', 'धर्मकन्या', वै'शाख वणवा', 'मानिनी', 'जिव्हाळा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' हे चित्रपट तयार झाले.
 
१९५७ साली स्थापन झालेल्या भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते. या संस्थेसाठी [[भारतीय संस्कृती कोश|भारतीय संस्कृतिकोशाचे]] दहा खंड लिहून त्यांनी पूर्ण केले. याशिवाय चार खंडांचा मुलांचा संस्कृती कोशही त्यांनी तयार केला.