"केतकी माटेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
केतकी माटेगावकर आईबरोबर अनेक कार्यक्रमातून गाणे सादर करत असे, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या [[झी मराठी]] वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी केतकीला जगभर प्रसिद्धी मिळाली. आजारपणामुळे तिला स्पर्धेतुन बाहेर पडावे लागले, दरम्यान केतकीने २०१२ मध्ये [[मिलिंद बोकील]] यांच्या कादंबरीवर आधारित [[शाळा (चित्रपट)|शाळा]] या मराठी चित्रपटामार्फत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, मुळातच ही कादंबरी अतिशय गाजलेली असल्याने त्यावरील या चित्रपटास देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शालेय जीवन, पहिलं प्रेम अशा अनेक गोष्टींचं चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.
 
या चित्रपटानंतर केतकीने "आरोही… गोष्ट तिघांची" या कौटुंबिक सामाजिक चित्रपटात "[[मृणाल कुलकर्णी]]" व "किरण करमरकर" या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. यानंतर प्रतिकुल परिस्थितीतून शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीच्या प्रवासाची कथा सांगणारा तानी हा चित्रपट केला, यानंतर [[महेश मांजरेकर]] यांच्या [[काकस्पर्ष|काकस्पर्श]] या चित्रपटात केतकीने [[प्रिया बापट]] हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली, '''केतकी माटेगावकर''' यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
 
२०१४ मध्ये आलेला [[रवी जाधव]] दिग्दर्शित टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे [[प्रथमेश परब]] हा नवोदित कलाकार होता. किशोरवयातील प्रेम यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट होता. तसेच नंतरच्या काळात फुन्त्रू या मराठी चित्रपटात देखील ती दिसली.