"विलास वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्म आणि शिक्षण
ओळ ३:
प्रा. विलास वाघ (जन्म : १ मार्च १९३९ - २५ मार्च २०२१){{Sfn|कांदळकर|२०२१}} हे मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते होते. 'सुगावा' ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच 'सुगावा' ह्या प्रकाशनसंस्थेद्वारे प्रकाशक म्हणून त्यांनी प्राधान्याने आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित वैचारिक साहित्य प्रकाशित केले. {{Sfn|जगताप|२०२१}}
 
==जन्म, शिक्षण आणि शिक्षणनोकरी==
प्रा. वाघ ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे झाला. प्रा. वाघ ह्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबाचे पालनपोषण त्यांच्या आईने कष्टपूर्वक केले.{{Sfn|कसबे|२०१५}} गरिबीमुळे धुळे येथील हरिजन सेवा संघाच्या राजेंद्र छात्रालय ह्या वसतीगृहात त्यांना शिक्षणासाठी ठेवण्यात आले. त्यांचे शालेय शिक्षण उशिरा म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी सुरू झाले. {{Sfn|कसबे|२०१५}} पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानविषयातील पदवी प्राप्त केली. {{Sfn|कांदळकर|२०२१}} {{Sfn|कसबे|२०१५}}
 
पदवी प्राप्त केल्यानंतर वाघ ह्यांनी काही काळ कोकणातील नरडावणे येथे शालेय शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर १९८१पर्यंत पुणे येथील अशोक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुणे येथील भारतीय शिक्षणसंस्थेत त्यांनी प्रौढशिक्षण विभागात काही काळ काम केले. तसेच पुणे विद्यापीठात प्रौढशिक्षण विभागात चार वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी उषाताई वाघ ह्यांच्यासह सामाजिक कार्यात सक्रिय होण्यासाठी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा दिला. {{Sfn|कसबे|२०१५}}
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विलास_वाघ" पासून हुडकले