"चिंकी यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
माहितीत भर.
ओळ ३:
==सुरुवातीचे आयुष्य आणि वैयक्तिक जीवन==
यादवचा जन्म मध्य प्रदेशातील [[भोपाळ]] येथे २६ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. तिचे कुटुंब तात्या टोपे नगर क्रीडा संकुलाच्या आवारात एका खोलीत वसतिगृहात राहत होते.<ref name=":0" /> तिचे वडील मेहताबसिंग यादव तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. यादव तिच्या वडिलांसोबत कॉम्प्लेक्समधील शूटिंगच्या रेंजवर जात असे. २०१२ मध्ये तिने या खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. तिने जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत पिस्तूल शूटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचा धाकटा भाऊ राजेशने शॉटगन निवडली पण त्याने चिंकीइतक्या गंभीरपणे खेळात कारकीर्द घडवली नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.newindianexpress.com/sport/other/2019/nov/09/one-room-house-to-olympic-quota-2059216.html|title=One-room house to Olympic quota|website=The New Indian Express|access-date=2021-03-27}}</ref>
==कारकीर्द==
२०१५ मध्ये कुवेत शहरातील आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात चिंकी यादवने कांस्य पदक मिळवले. २०१६ मध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्यपदक तर सुहल येथे त्याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तिने सुहल येथे २०१७ मध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मुस्कान आणि गौरी शेओरान यांच्यासह सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
यादवने २०१९ च्या आशियाई एशियन नेमबाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत ५८८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. या कामगिरीमुळे २०२० उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताला कोटा मिळाला कारण अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांपैकी चार स्पर्धकांनी यापूर्वी या स्पर्धेसाठी कोटा मिळवला होता. ११६ गुणांसह तिने अंतिम फेरीत सहावे स्थान मिळवले.
 
 
 
{{संदर्भनोंदी}}