"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (6) using AWB
छो (शुद्धलेखन, replaced: {{भारतातील बॅंका}} → {{भारतातील बँका}} using AWB)
छो (शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (6) using AWB)
बॅंकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात.ग्राहकाच्या बॅंक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडलेले असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड देताना बॅंकेकडून ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक दिला जातो. त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) म्हणतात. यंत्रात टाकलेले एटीएम कार्ड व संबंधित PIN जुळले तरच एटीएम यंत्र व्यवहार पूर्ण करते. सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता या आर्थिक व्यवहारांकरताच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता हे यंत्र करते.
 
एटीएम यंत्राद्वारे, बॅंक ग्राहकास खात्यावरील शिल्लक तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे करणे अशा गोष्टी करता येतात. ग्राहक आपला पिन केव्हाही बदलू शकतो. एटीएम यंत्र परदेशांत विविध नावांनी ओळखले जाते. जसे ऑटोमेटेड ट्रॅंझॅक्शन मशीन, ऑटोमेटेड बॅंकिंगबँकिंग मशीन, मनी मशीन, बॅंक मशीन, कॅश मशीन, कॅश पॉइंट, बॅंकोमॅट इत्यादी..
 
==इतिहास==
 
== वित्तीय महाजाल ==
धनादेशाचा पाया कोअर बॅंकिंगबँकिंग यंत्रणेवर उभारलेला आहे. कोअर बॅंकिंगबँकिंग यंत्रणेत ग्राहकाच्या खात्याची खातेवही आता शाखास्तरावर नव्हे, तर केंद्रीय मुख्यसंगणकावर सांभाळून ठेवलेली असते. एटीएम्स ही त्या त्या बॅंकेच्या केंद्रीय महासंगणकाशी जोडलेली असतात. परिणामी, या बॅंकेच्या कोणत्याही शाखेत किंवा एटीएमवर आपल्या खात्याचा तपशील ग्राहकास उपलब्ध असतो. प्रत्येक बॅंकेला प्रत्येक शहरात एटीएम बसविणे भारतासारख्या खंडप्राय देशात अशक्य आहे. त्यामुळे सहकार्याच्या भावनेतून व व्यावसायिक दृष्टिकोनातून बॅंकांनी आपापली एटीएम्स एकमेकांस उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त होते. पण त्याकरता प्रत्येक बॅंकांची नेटवर्क्स एकमेकांशी जोडली जायला हवीत. दोन वा अधिक बॅंकांचे जाळे जोडणारा दुवा म्हणजे स्विच. याच्या माध्यमातून एका बॅंकेच्या एटीएममधून दुसऱ्या बॅंकेतल्या आपल्या खात्यावर व्यवहार करणे शक्य होते. या व्यवहारात खातेदारास एटीएम वापराबद्दल काही शुल्क मोजावे लागते. हे शुल्क स्विच आणि एटीएमबॅंक ठरावीक प्रमाणात वाटून घेतात.
 
====स्विच====
“स्वधन” बंद पडले, तरी स्विचची आवश्यकता सदस्य बॅंकांना मनोमन पटली होता असे दिसते. कारण लगेचच “स्वधन” च्या बंद पडण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरता बॅंकांनी एकत्र येऊन पर्यायी स्विचच्या उभारणीस चालना दिलेली होती. २००३मध्येच MITR, CASHTREE, तर २७ फेब्रुवारी २००४ रोजी BANCS असे स्विच अवतीर्ण झाले. परंतु प्रत्येक स्विच कांही मर्यादित सदस्य बॅंकांना सेवा पुरवीत असे. त्यामुळे मर्यादा पडणे अटळ होते. सर्व एटीएम्स एका छत्राखाली येणे आवश्यक होते आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, कायमस्वरूपी भांडवली खर्च याची जुळवणी करणे महाकठीण कार्य होते. निव्वळ भौगोलिकदृष्ट्या ह्या देशाचा पसारा एवढा प्रचंड आहे, की हा व्याप फारच अजस्र ठरणार हे निश्चित. त्यामुळे २७-८-२००४ रोजी हैदराबादस्थित IDRBT (Institute for Development and Research in Banking Technology) या रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीतल्या संस्थेने National Financial Switch (NFS) ची उभारणी केली तेव्हा खऱ्या अर्थाने भविष्यातल्या जबाबदाऱ्या पेलणारा समर्थ स्विच देशास मिळाला. आजमितीला देशातली जवळपास प्रत्येक बॅंक या स्विचची सदस्य आहे, आणि याच्या छत्राखाली सुमारे ४८ हजार एटीएम्स आहेत. प्रत्येक एटीएम व्यवहारावर पडणाऱ्या शुल्काचा ठरावीक भाग हा या NFS च्या उत्पन्नाचा भाग होता. आपल्या बॅंकेच्या एटीएममधून काढलेल्या रकमेवर शुल्क पडत नसे; पण अन्य बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास माफक शुल्क पडे. वगे उल्लेख केल्याप्रमाणे, हे शुल्क स्विच आणि एटीएमबॅंक ठरावीक प्रमाणात वाटून घेत.एटीएम वापरल्याबद्दल बॅंकेला आणि नेटवर्क वापरल्याबद्दल स्विचला मोबदला मिळे. शुल्क किरकोळ असल्याने ग्राहकाला त्याचा भारही वाटत नसे.
 
आणि एके दिवशी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने फतवा जाहीर केला, की xxxx सालच्या १ एप्रिल पासून ग्राहकास एटीएमच्या वापराबद्दल पडणारे शुल्क रद्द केले जाईल. एटीएम्सचा वापर वाढावा, ग्राहकास बॅंकेत जाण्यापेक्षा एटीएमकडे जाण्यास प्रोत्साहन मिळावे, एटीएम सोयीचे असल्याने एटीएमकार्डधारकांची संख्या वाढावी व बॅंकिंगलाबँकिंगला इप्सित भविष्याकडे जाण्यासाठी रेटा मिळावा असे स्तुत्य हेतू यामागे होते. ग्राहककेंद्रित बॅंकिंगच्याबँकिंगच्या दिशेत हे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.
 
याचा सकारात्मक परिणाम झालाही. आपल्या बॅंकेचे धनयंत्र शोधण्यापेक्षा कोणतेही धनयंत्र निःशुल्क सेवा देते म्हणता वापराचे प्रमाण धडाधड वाढले. एकदम मोठी रक्कम काढून, ती सांभाळत बसण्यापेक्षा लागेल तेवढीच नेमकी रक्कम पुनःपुन्हा काढण्याकडे सामान्य कल वाढला.यामुळे लहानसहान रकमांची संख्या डोंगराएवढी वाढली. एटीएम ‘ना नफा ना तोटा’ पातळीवर येण्यासाठी त्याचा दरदिवशी वापर अमुक इतक्या वेळा व्हायला हवा असे गणित सपशेल चुकू लागले. कारण शुल्क रद्द झाल्याने परिसरातले इतर बॅंकांचे ग्राहक बेधडक हे एटीएम वापरू लागले. एटीएममध्ये पैसे भरावे लागण्याची वारंवारता वाढू लागली. यात ज्या बॅंकांचे एटीएमजाल छोटे होते, त्यांच्या ग्राहकांना देशभरातली, सर्वच बॅंकांची एटीएम्स अगदी मोफत उपलब्ध झाली. याउलट ज्या बॅंकांनी भरपूर भांडवली खर्च करत प्रचंड एटीएमविस्तार केला होता, त्यांचे हे कार्य भाकड ठरू लागले. उत्पन्न शून्य आणि एटीएम चालू ठेवण्याकरताचा अनुत्पादक खर्च मात्र चढता. प्रत्येक वापरामागे १८ त २० रु. एवढी फी आता ग्राहकाऐवजी बॅंकेस भरावी लागू लागली. उदा० आयसीआयसीआय बॅंकेस दरमहा अदमासे ४ ते ५ कोटी रुपये फी म्हणून देणे भाग पडू लागले. त्यांत लहानसहान रकमांची वाढती संख्या. हे धर्मादाय पाणपोईसारखे होऊ लागले. अनेक बॅंका, त्यांची विविध नेटवर्क्स, त्यांचे पुष्कळ ग्राहक, आणि परिणामी एटीएम्सकडून व्यवहार नाकारले जाण्याचे किंवा खात्यावरील रक्कम वजा होऊनही हाती पैसे न येण्याच्या घटनांचे प्रमाण वाढू लागले. बॅंकांच्या अंतर्गत बाबींत अशा अर्ध्याकच्च्या व्यवहारांचे व्यवस्थापन ही आणखी एक मोठी डोकेदुखी होऊन बसली. हे थोडे म्हणून का काय, पण रिझर्व्ह बॅंकेने अशा अपूर्ण व्यवहारांचे समाधान करण्याची किमान कालमर्यादाही आखून दिली. ही मर्यादा मोडल्यास ती ग्राहकसेवेतल्या त्रुटीची बाब गणली जाईल अशी गर्भित धमकी त्यात होतीच. म्हणजे, एटीएम हे एक विकतचे दुखणेच होऊन बसले. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयामुळे ग्राहकाचे हित होणार असले तरी बॅंकांना एटीएम उभारणीस आवश्यक प्रोत्साहन नाकारले गेले होते. बंधने पाळूनही, व्यवसाय चालू राहण्यासाठी एक किमान नफ्याचे गाजर समोर असणे आवश्यक असते. त्याच्या अभावी, नुकसानीतली एटीएम्स बंद होत जातील आणि तोवर एटीएमकार्डधारकांची संख्या लक्षणीय झालेली असेल हे सांगायला कोण्या तज्ज्ञाची गरज नव्हती.
 
[[वर्ग:यंत्रे]]
[[वर्ग:बॅंकिंगबँकिंग तंत्रज्ञान]]
[[वर्ग:बॅंकेची साधने]]
७५,५७९

संपादने