"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1780803 by TivenBot on 2020-04-26T10:54:24Z
छोNo edit summary
ओळ ४१:
 
==कारकीर्द==
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करून, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''[[कभी खुशी कभी गम]]'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करीनाने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करीनाने तिच्या ''[[जब वी मेट]]'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करीनाने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
 
==आत्मचरित्र==