"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎उपयोग: छोटा बदल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४०:
==पेनिसिलीन==
===इतिहास===
इ. स. १९२९ मध्ये [[ॲलेक्झांडर फ्लेमिंग]] यांना असे आढळले की, संवर्धन माध्यमात (सूक्ष्मजीवांची वाढ व्हावी यासाठी तयार केलेल्या पोषक पदार्थांच्या मिश्रणात) होत असलेली [[स्टॅफिलोकॉकस]] जंतूंची वाढ अकस्मात एका बुरशीच्या संसर्गाने खुंटली. ही बुरशी [[पेनिसिलियम]] वंशाची आहे आणि तिचे संवर्धन केले असता मिळणारा [[द्रव]] आणि त्यातील [[पदार्थ]] यांच्या अंगी [[जंतुप्रतिकारक]] गुण आहे. हे समजल्यावर त्यांनी त्या पदार्थांला ‘[[पेनिसिलीनपेनिसिलिन]]’ हे नाव दिले. ही बुरशी पेनिसिलयम नोटॅटम आहे हे [[चार्ल्स टॉम]] यांनी दाखविले. पेनिसिलीन अस्थिर असल्यामुळे ते शुद्ध रूपात वेगळे काढणे आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे त्या वेळी शक्य झाले नाही.
 
बुरशीचे संवर्धन करून पेनिसिलीन वेगळे करण्यासंबंधीचे प्राथमिक प्रयोग पी. डब्ल्यू. क्लटरबक, आर. लोएल आणि एच. रेसट्रिक यांनी १९३२ च्या सुमारास केले. त्यानंतर १९३८-४० या कालखंडात एच्. डब्ल्यू. फ्लोरी, ई. चेन आणि त्यांचे सहकारी यांनी [[ऑक्सफर्ड]] येथे संशोधन करून पेनिसिलिनाचे एक घनरूप [[लवण]] मिळविले. हे पूर्णपणे शुद्ध नव्हते, तरी [[मानव]] व इतर प्राणी यांवर त्याचा काय परिणाम होतो ह्याचा [[अभ्यास]] करता आला आणि त्यावरून असे दिसून आले की, ते जतुंप्रतिकारक म्हणून वापरण्यायोग्य आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले