"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abbasquadir (चर्चा | योगदान) छो {{cn}} खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
Abbasquadir (चर्चा | योगदान) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ |
||
ओळ ८२:
==== [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
[[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे [[नागसेन वन]] असे नामकरण करून तेथे [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]च्या [[मिलिंद महाविद्यालय]]ाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर [[मराठवाडा विद्यापीठ]] स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी झाले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. या प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
====[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरित क्रांतीचे प्रणेते [[वसंतराव नाईक]] यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात आला.{{citation needed|July 2020}}
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्न कृषितंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषी शाखेच्या नऊ विषयांत, अन्नतंत्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो.{{citation needed|July 2020}}
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत असून आजपर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्त कृषी औजारे व यन्त्रे विकसित करून शेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्या आहेत.{{citation needed|July 2020}}
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषी तन्त्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषी विस्तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.{{citation needed|July 2020}}
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्टेम्बर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्या बियाणाचे वाटप केले जाते. [[सावित्रीबाई फुले]] यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.{{citation needed|July 2020}}
===नामांकित शिक्षण संस्था===
Line १०३ ⟶ १००:
* मराठवाडा शिक्षण प्रसारक मण्डळ
* योगेश्वरी शिक्षण संस्था, अम्बाजोगाई
* सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद.{{citation needed|July 2020}}
==साहित्य आणि साहित्यिक==
|