"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == ==1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक...
(काही फरक नाही)

२३:२७, १८ जून २०२० ची आवृत्ती

==

1]विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकीय पक्ष

1.1] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी

पोलिंग एजंट ते डेप्युटी सरपंच व डेप्युटी सरपंच ते नगरसेवक आणि नगर सेवक ते राष्ट्रिय नेता अशा आपल्या जीवनयापनाच्या प्रवासातील भारतातील राजकारणातील विविध भुमिका बजावणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे होय. विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन विचारानुसार नानासाहेब इंदिसे यांनी घेतलेला युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा,तसेच भारतीय राजकारणातील रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडियावर टाकलेला प्रकाशझोत

1.2] नानासाहेब इंदिसे यांचे बालपण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडिल दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रीक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रीक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले. 

1.3] ठाणे येथे प्रयाण

नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965 ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966 ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायीक झाले.

1.4] भारतीय राजकरणात प्रवेश

वडिलांकडुनच बालपणा पासुन राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967 ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पुर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966 ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासुन नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते.