"अत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
अत्तर हे झाडांच्या विविध स्त्रोतांमधून मिळविलेले एक सुगंधी तेल आहे. सामान्यत: ही द्रव्ये ऊर्ध्वपातनाद्वारे बनवली जातात. इब्न सीना, ह्या पर्शियन भौतिक शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ऊर्ध्वपातनाद्वारे फुलांचे अत्तर तयार केले. [१] अत्तर रासायनिक मार्गाने वेगळे केले जाऊ शकते परंतु सामान्यत: नैसर्गिक सुगंधी द्रव्य पाण्याच्या सहाय्याने मिळवली जातात. ऊर्ध्वपातनाद्वारे मिळालेली द्रव्य साधारणपणे चंदन किंवा इतर लाकडाच्या मडक्यात/सुरळीत ठेवून त्यांना बऱ्याच वेळासाठी ऊन्ह दाखवली जातात. उन दाखवण्याचा किंवा जुनं करण्याचा कालावधी वापरल्या जाणार्‍या फुलाच्या,वनस्पतीच्या शास्त्रीय वैशिष्ट्य आणि इच्छित परिणामांवर अवलंबून एक ते दहा वर्षे असू शकतो. तांत्रिकदृष्ट्या अत्तर म्हणजे फुले, औषधी वनस्पती, मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण जे बऱ्याच दिवसांकरता उकळवले जाते, उकळवणे थांबवले जाते ही प्रक्रिया साधारणपणे तीन दिवस चालते त्यानंतर त्यांना उन्हात ठेवले जाते, ज्यानुसार मडक्यातील पाण्याचा अंश निघून जाऊन शुद्ध अत्तर मिळेल हि पद्धत उत्तर प्रदेशातल्या कन्नौज मध्ये आजही वापरली जात आहे. [२]
 
=='इतिहास'==
'अत्तर' हा शब्द पारशी 'इतिर' या शब्दापासून आला आहे असा अर्थ आहे 'इत्र', [3] ज्याचा अर्थ हा सुगंधी द्रव्य असा होतो.
 
ओळ १०:
येमेनमध्ये, येमेनची राणी 'अरवा अल-सुलेही' यांनी अत्तरची एक विशेष पद्धतीचं अत्तर आणलं. हा अत्तराचा प्रकार पर्वतीय फुलांपासून तयार केला गेला होता आणि अरबच्या राजांना भेट म्हणून दिला गेला.
 
अबुल फजल फाईसी यांनी मकबरऱ्यात लावण्यात येणारी धूपबत्ती बनवण्यासाठी अत्तराचा कसा वापर केला जातो ह्याचा पुरावा दिला. फाईसीच्या मते अकबरच्या काळात वापरल्या जाणार्‍या द्रव्यामध्ये कोरफड, चंदन आणि दालचिनी समाविष्ट होती. मायरह, कस्तुरी आणि अंबर सारख्या प्राण्यांच्या अंशासोबत विशिष्ट झाडांच्या मुळांसह आणि इतर काही मसाल्यांचा वापर केला जात असे. अवधचा शासक, गाझीउद्दीन हैदर शाह आपल्या शयनकक्षाच्या भोवती अत्तरचे कारंजे तयार करायचा. हे कारंजे सातत्याने कार्यक्षम राहून तिथं आल्हाददायक सुवासिक आणि प्रणयकारक वातावरण तयार करत.
 
=वापर आणि प्रकार=
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्तर" पासून हुडकले