"भेळपुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[भेळपुरी]] हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खारट,[[आंबट]],गोड,तिखट एकत्रित करून बनविलेला चवदार उपहार आहे. हा गप्पा मारता मारता खाण्यासाठीही उपयोगात आणला जातो. याला चाट नावानेही संबोधिले जाते. हे बनविण्यासाठी जाडे तांदूळ, भाज्या आणि सॉस यांचा वापर करतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://food.ndtv.com/recipe-bhel-puri-99035|शीर्षकtitle=भेळ पुरी रेसिपी |प्रकाशक=फूड.एनडीटीवी.कॉम |दिनांक=२४ जानेवारी २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१७}}</ref>
 
भेळपुरी मुंबईचे गिरगाव, जुहू, या चौपाटीवर नियमित मिळते. मुंबईतील सर्व गल्लीबोळातून याच्या फिरत्या गाड्या पाहावयास मिळतात. हा उपहार रस्त्यावर खाण्याचाच आहे हे विचार ग्रहित धरलेले आहेत. भेळपुरीचा प्रसार अगदी भारतातील कानाकोपर्‍यात झालेला आहे. भारताचे विविध प्रदेशात त्या त्या हवामानानुसार किंवा परिस्थितीनुसार भेळपुरी बनविण्यासाठी तेथील उपलब्ध पदार्थांचा वापर केला जातो. भेळपुरीचे मूळं स्वरूप भडंग आहे. भडंग हा पच्छीम महाराष्ट्रातील उत्तम असा तेलकट, आंबट, गोड, तिखट, चवीचा पदार्थ आहे. भडंगचा वापर करून कोरडी भेळपुरी तयार केली जाते. कोलकत्ता मध्ये भेळपुरीला झालमुरी म्हणतात. तेथे ही तेल वापरुन जाडे भातापासून बनवितात. मैसूर मध्ये भेळपुरीला चुरुमुरी आणि बंगलोर मध्ये चुरमुरी म्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://churumuri.blog/what-is-churumuri/ |शीर्षकtitle= व्हॉट इज चुरमुरी |प्रकाशक=चुरमुरी.ब्लॉग |दिनांक=२४ जानेवारी २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक=१८ डिसेंबर २०१३}}</ref> कोरडी भेळपुरी जी भडंग म्हणून प्रसिद्ध आहे तिच्यावर कांदा, लिंबू रस, कोथिंबीर, यांचा दिमाखदार थर पसरवून लिंबूरस पिळून ती खावयास देतात.
 
==इतिहास==
ओळ ७:
 
==भेळपुरी बनविण्यासाठीचे पदार्थ==
भेळपुरी बनविण्यासाठी साधारणपने जाडा भात, बेसन पिठापासून बनविलेले विविध आकाराचे नूडल्स, व बटाटा, कांदा, चाट मसाला, चटणी, आणि विविध प्रकारचे तळलेले मसाले यांचे मिश्रण वापरतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.indianfoodforever.com/snacks/bhel-puri.html |शीर्षकtitle=हाऊ टू मेक भेळ पुरी - भेळ पुरी रेसिपी |प्रकाशक=इंडियनफूडफॉरेव्हर.कॉम|दिनांक=२४ जानेवारी २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१७}}</ref>
 
गिर्हाइकाच्या सवयीनुसार नुसार आणि आदेशानुसार चाट मसाला, तिखट, यांचे प्रमाण वापरुन भेळपुरी बनविली जाते. उत्तर भारतात शिजविलेल्या बटाट्याचे लहान लहान तुकडे करून वापर करतात. चाट साठी मुख्यता दोन प्रकारच्या चटणी असतात. त्यात एक म्हणजे गोडी असणारी तपकिरी रंगाची प्रसिद्धचटणी आणि दुसरी हिरव्या रंगाची तेलकट की जी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरी पासून बनविलेली असते! यांचा वापर करतात.
 
==विविधता==
भेळपुरी बनविताना ते विविध प्रकारे बनविली जाते. त्यात भात पसरवून त्यावर आंबट - गोड आंब्याच्या बारीक बारीक चकत्या पसरवितात. शिवाय त्यावर कांदा, कोथिंबीर, लिंबू रस, बटाटा टोमॅटो, चाट मसाला यांची पेरणी असतेच.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.spicytreats.net/2013/09/bhel-puri-easy-healthy-chaat-recipe.html |शीर्षकtitle= इझी ॲंड हेल्दी चाट रेसिपी |प्रकाशक=स्पायसीट्रीट्स.नेट |दिनांक=२४ ऑक्टोबर २०१६ | अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१७}}</ref> कधी कधी हे सर्व मिश्रण लहानश्या पुरीवर पसरवून ती पुरी सहीसलामत मुखात जाईल अशा प्रकारे सर्व्ह केली जाते. किंवा गव्हाचे पिठापासून बनविलेल्या ब्रेडचाही वापर केला जातो.
 
भेळपुरीच्याच ज्या अनेक विविधता आहेत त्यांची नावे अनेक आहेत त्यात सेवपुरी, दहिपुरी, सेव पापडी चाट, चुरमुरी, यांचा समावेश होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भेळपुरी" पासून हुडकले