"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
==अर्थ==
चैत्य या शब्दाचे जीवात्मा, सीमेवरचे झाड, यज्ञवेदी, जैनांचे मंदिर, पार बांधलेला पवित्र वृक्ष असे वेगवेगळे अर्थ होतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=मार्च २०१०|isbn=|location=|pages=पृष्ठ कर.४६०}}</ref>
 
==विहार आणि चैत्य==
बौद्ध स्थापत्यात विहार आणि चैत्य हे दोन्ही आढळते. विहार हे प्रामुख्याने भिक्खू सदस्यांची निवासस्थाने असत. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wQ2x0cbZkn0C&pg=PA57&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEITzAH#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|शीर्षकtitle=Buddhist Art in India, Ceylon, and Java|last=Vogel|first=Jean Philippe|last2=Barnouw|first2=Adriaan Jacob|date=1998|publisher=Asian Educational Services|isbn=9788120612259|language=en}}</ref>
 
==इतिहास==
[[वैदिक]] काळात सत्पुरुषांचे दहन केल्यानंतर त्यांच्या अस्थी, रक्षा आदी अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेदी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. ही प्रथा कालांतराने बौद्ध आणि जैन संप्रदायांत स्वीकारली गेली. मृताचे स्मारक म्हणून केवळ चबुतरा न बांधता त्यावर घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जाऊ लागले. '''चैत्य ही धार्मिक संज्ञा आहे तर स्तूप ही शिल्पशास्त्रातील संकल्पना म्हणून ओळखली जाते.''' <ref name=":1" />[[जैन]] साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.<ref>जोशी, सु.ह. – महाराष्ट्रातील लेणी </ref> <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3PXZ3RRcYeYC&pg=PA171&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEIPDAD#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|शीर्षकtitle=Encyclopaedia of Oriental Philosophy and Religion: A Continuing Series...|publisher=Global Vision Pub House|isbn=9788182201149|language=en}}</ref>
 
चैत्य हे ठरावीक उंचीवर व ठरावीक दिशेवरच असतात. जेव्हा [[सूर्य]]ाचे किरण स्तूपावर पडतात तेव्हा उजाडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्येही अंधार नसतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले