"साथीचे आजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1392071 by ज on 2016-05-06T00:53:52Z
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भ क्षेत्रात बदल. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २३:
 
[[वर्ग:संसर्गजन्य रोग]]
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लेगच्या साथीं’चा रोचक आढावा
.
जगाच्या इतिहासातील कमी काळात सर्वाधिक बळी घेणाऱ्या तीन प्रमुख महामारी. त्या एकाच जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) उद्भवल्या. हा जीवाणू म्हणजे, ‘येरसिनिया पेस्टिस’. त्याच्यामुळे घडलेल्या भयंकर महामारी म्हणजे ‘प्लेगच्या साथी’.
प्लेगच्या साथींनी संपूर्ण जगाला कवेत घेतले. तसा प्लेग अनेकदा उद्भवला, त्याने लाखोंचे बळीसुद्धा घेतले. पण जगाचा इतिहास आणि चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलून टाकणाऱ्या या तीन प्रमुख साथी. त्या घडल्या नसत्या तर जगाच्या व्यवस्था आतासारख्या नसत्या, त्या काही वेगळ्या असल्या असत्या.
या साथींबाबतचे हे रोचक संकलन, रोगांच्या निमित्ताने जगाचा इतिहास सांगणारे आणि बरेच काही शिकवणारे... खास “भवताल”च्या वाचकांसाठी !
 
१. जस्टीनाईनचा प्लेग (सहावे शतक)
 
तसा प्लेग दुसऱ्या शतकातही उद्भवला होता, पण त्याचे महाभयंकर स्वरूप सहाव्या शतकात पाहायला मिळाले. ‘जस्टीनाईनचा प्लेग’ या नावाने ओळखली जाणारी ही महामारी. वर्ष होते इसविसन ५४१. बायझान्टाईन साम्राज्य हे त्या काळातील युरोपातील प्रसिद्ध साम्राज्य आणि जस्टीनाईन हे सम्राटाचे नाव.
 
बायझान्टाईन साम्राज्य हे रोमच्या विभाजनानंतर निर्माण झाले होते. वैभवशाली रोमन साम्राज्य पुढच्या काळात विभागले गेले. त्यापैकी रोमच्या पूर्व, दक्षिण भागावर असलेले राज्य बायझान्टाईन या नावाने ओळखले जात होते. त्याची राजधानी होती, कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल. हे शहर मध्ययुगात युरोपातील सर्वांत श्रीमंत शहर म्हणून ओळखले जात होते.
 
जस्टीनाईन हा इसविसन ५२७ ते ५६५ या काळात या साम्राज्याचा सम्राट होता. तो उत्तम प्रशासक म्हणून ओळखला जाई. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केलेल्या सुधारणा.
 
इजिप्त ते कॉन्स्टँटिनोपल
सम्राट जस्टीनाईन याच्याच काळात या साम्राज्यात प्लेग पसरला. तो इजिप्तमार्गे तिथे पोहोचला. त्याचे झाले असे. या साम्राज्यात नव्यानेच इजिप्तचा प्रदेश जोडला गेला. या प्रदेशातील लोकांनी सम्राटाच्या सन्मानार्थ राजधानीत (कॉन्स्टँटिनोपल) धान्य पाठवले. पण या धान्यासोबत काय जाणार होते, याचा अंदाज कोणालाच आला नाही. धान्यासोबत काळे उंदीरही राजधानीच्या शहरात पोहोचले. या उंदरांसोबत प्लेगच्या जीवाणूचा प्रसार करणाऱ्या पिसवादेखील पोहोचल्या. त्यांनी हा रोग राजधानीच्या शहरात नेला. ते वर्ष होतं इसविसन ५४१.
 
प्लेग राजधानीच्या शहरात म्हणजे कॉन्स्टँटिनोपलमध्ये धडकला. या रोगाने लगेचच कॉन्स्टँन्टिनोपला कवेत घेतले. पुढे तो वणव्यासारखा संपूर्ण युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि अरेबियात पसरला. या महामारीने तब्बल ३ ते ५ कोटी लोकांचा जीव घेतला. काही अभ्यासकांच्या मते, या महामारीमध्ये त्या काळातील जगाची निम्मी लोकसंख्या मृत्युमुखी पडली. (काहींच्या मते पुढील दोन शतकांमध्ये त्याचा उद्भव सुरूच होता आणि बळींचा आकडा जगातील त्या वेळच्या एक चतुर्थांश लोकसंख्येइतका होता.)
 
रोमन साम्राज्याचे एकीकरण टळले
सम्राट जस्टीनाईन हा महत्वाकांक्षी होता. विभागलेले रोमन साम्राज्य एकत्र करण्याची त्याची योजना होती. मात्र, या महामारीमुळे त्याच्या साम्राज्याला मोठा आर्थिक धक्का बसला आणि त्याचे स्वप्न भंगले. परिणामी, युरोप मध्ययुगात लोटला गेला. या मनुष्य संहारामुळे ख्रिश्चन धर्म वेगाने वाढण्याच्या दृष्टीने पूरक परिस्थिती निर्माण झाली.
 
याबाबत डिपॉल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक थॉमस मॉकैटिस सांगतात, “या रोगाशी कसे लढायचे याबाबत लोकाना काहीच कल्पना नव्हती. लागण झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे एवढेच काय ते माहीत होते. या साथीचा अंत कसा झाला, याबाबतचा अंदाज म्हणजे ज्या लोकांमध्ये या रोगाची प्रतिकारक्षमता विकसित झाली, ते जगले. बाकी मृत्युमुखी पडले.”
.........
 
२. द ब्लॅक डेथ (चौदावे शतक)
 
जस्टीनाईन काळातील प्लेगच्या साथीने सहाव्या शतकात जगाला मोठा धक्का दिला आणि एक महामारी काय घडवू शकते, हे जगाला दाखवून दिले. प्लेग पूर्णपणे संपला नव्हता. पुढे आठशे वर्षांनंतर पुन्हा युरोपात उद्भवला. ही साथ १३४७ साली पसरली. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेले की, रस्त्यावर पडून सडणारे मृतहेद, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी-संसर्ग हे चित्र त्या काळात सर्वत्र पाहायला मिळे. अवघ्या चार वर्षांत तब्बल २० कोटी लोकांचा मृत्यू झाला. ही जगातील लोकसंख्येपैकी तब्बल एक-तृतियांश इतकी होती. तो ‘द ब्लॅक डेथ’ नावाने ओळखला जातो.
 
इतकी वर्षं लोटली तरी हा रोग का होतो, याबाबत नेमकेपणाने काही माहिती समजली नव्हती. एक बाब मात्र तोवर लक्षात आली होती. ती म्हणजे, रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या आजाराची लागण होते. त्यामुळे १४ व्या शतकात व्हेनिस राज्यात प्लेगच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी एक उपाय केला जाई. या राज्यातील रागुसा या शहराने एक उपाय शोधून काढला.
 
इतर बंदरांमधून येणाऱ्या जहाजांना रागुसा बंदरात प्रवेश देण्यापूर्वी ती ३० दिवसांसाठी बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवाली लागत. तोवर जहाजावरील कणी आजारी पडले नाही, तरच त्या जहाजांना शहरात प्रवेश दिला जाई. अशा प्रकारे ही जहाजे ‘क्वारंटाईन’ केली जात. पुढे व्हेनिस राज्याने ही पद्धत स्वीकारली. काळाच्या ओघात हा काळ ३० ऐवजी ४० दिवस इतका करण्यात आला. ‘क्वारंटाईन’ हा शब्दही इटालियन भाषेतून आला आहे. ‘quaranta giorni’ म्हणजे चाळीस दिवस. ही पद्धत पुढे युरोपात स्वीकारली गेली. त्याचा निश्चित उपयोग झाल्याचे इतिहासकार सांगतात.
 
युरोपातील राजकीय परिणाम
या महामारीने युरोपात अनेक राजकीय बदल घडवले.
• या महामारीने इंग्लंड आणि फ्रान्स या देशांना इतके हतबल केले की त्यांच्यात सुरू असलेले युद्ध त्यांना थांबवावे लागले.
• बदललेली आर्थिक परिस्थिती आणि लोकसंख्येचे बदललेले प्रमाण यामुळे ब्रिटनमधील सरंजामी व्यवस्था पार कोलमडून पडली. तिथे नवी व्यवस्था उभी राहण्याच्या दृष्टीने पूरक परिस्थिती निर्माण झाली.
• ग्रीनलँडमधील लढवय्यी व विध्वंसक जमात असलेल्या ‘वायकिंग’ यांचेही प्लेगमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे उत्तर अमेरिकेत पोहोचून तेथील प्रदेश ताब्यात घेण्याचे स्वपही भंगले.
.....
 
३. लंडन प्लेग (सतरावे शतक)
 
चौदाव्या शतकातील प्लेगच्या साथीतून लंडन शहर लवकर पूर्णपणे बाहेर पडू शकले नाही. कारण ही साथ १३४८ नंतर पुढे तीनशे वर्षांच्या काळात दर वीसेक वर्षांनंतर डोके वर काढतच होती. या संपूर्ण काळात लंडनमधील तब्बल २० टक्के लोकांचा मृत्यू झाला.
 
इंग्लंडने १५०० च्या सुरुवातीला रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवण्याचा (विलगीकरण) कायदा केला. ज्या घरात प्लेगचे रुग्ण होते, त्यांच्या घराबाहेर तशा खुणा उभारण्यात आल्या. रुग्णाच्या घरातील लोकांना बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाताना पांढऱ्या रंगाची काठी सोबत न्यावी लागे.
 
त्या काळी अशीही एक समजूत होती की, कुत्री व मांजरांमुळे हा रोग पसरतो. त्यामुळे लाखो प्राण्यांची एकत्र कत्तल करण्यात आली. १६६५ साली या साथीने कळस गाठला. अवघ्या सात महिन्यांमध्ये लंडनमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला. मनोरंजनाचे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांना बळजबरीने त्यांच्या घरात कोंडण्यात येत होते. त्यांच्या घरांवर लाल फुली रंगवण्यात येत असे आणि ‘देवाची आमच्यावर दया आहे’ असे लिहले जात असे. मृतांचे एकत्रित दफन केले जाई.
ही साथ रोखण्याचा हाच एक मार्ग उरला होता, तो हाती घेण्यात आला.
......
अशा या ऐतिहासिक महाभयंकर साथी. त्यांनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्याशी तुलना केल्यावर आताच्या कोरोना विषाणू साथीशी अनेक समान धागे दिसतात का? हे शोधणे अधिक रंजक आणि उद्बोधक ठरेल.
 
(संदर्भ – पेन्डॅमिक दॅड चेंज्ड हिस्टरी लेख ; हाऊ ५ ऑफ हिस्टरीज् वर्स्ट पेन्डॅमिक फायनली एन्डेड लेख)
(सौजन्य – हिस्टरी.कॉम)
(संकलन व अनुवाद – टीम भवताल)