"रेशीमकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Reverted to revision 1743199 by Shweta100 on 2020-03-08T12:59:41Z)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
इस्लामी राजवटीत इराणमध्ये धार्मिक पुस्तकांतील चित्रे तसेच पानाफुलांच्या अलंकरणात चित्रशैलीचा प्रभाव दिसू लागला. अरबी लिपीच्या अक्षरांचाही अंतर्भाव वस्त्रातील अलंकरणात झाला. या काळातील किनखाबी वस्त्रांत जरीच्या कापडाच्या पार्श्वभूमीवर मखमली विणीत उठावदार दिसणाऱ्या आकृती अत्यंत मोहक, झगझगीत रंगांत विणल्या गेल्या. दुसरे महत्त्वाचे तंत्र म्हणजे, दुहेरी विणीचे कापड विणले गेले. यात जरीच्या धाग्याबरोबरच तिहेरी वीण वापरून विणलेले वस्त्र याखेरीज वेगवेगळ्या विणींचा एकाच कापडात वापर करून विणलेली ‘लंपास’ वस्त्रेही प्रसिद्धीस आली. इराणी वस्त्रांच्या रंगसंगतीत पिवळट हिरवा, गडद हिरवा, करडा, झगझगीत निळा, लाल असे अनेक रंग वापरले गेले. नक्षीत गडद निळ्यावर पांढरा व करडा, लालभडक पार्श्वभूमीवर सोनेरी अशा सुंदर रचना आढळतात. गडद जांभळा रंग राजवस्त्रांसाठी वापरला गेला.
 
बायझंटिन : बायझंटिन साम्राज्यकाळात (इ. स. ३३० ते १४५३) रेशमी कापड सोन्याइतके मोलाचे मानले जाई. प्रसिद्ध बायझंटिन सम्राट पहिला जस्टिनिअन (४८३-५६५) याने तिबेटी साधूंना मोठे आमिष दाखवून त्यांच्याकरवी रेशमी किड्यांची अंडी आणविली व रेशमी वस्त्रांचे उत्पादन कॉन्स्टँटिनोपलकॉन्स्टॅंटिनोपल येथे सुरू केले. राजांच्या कार्यशाळांत सुरूवातीला इराणी व सिरियन विणकर हे उत्पादन करू लागले. साहजिकच इराणी अभिकल्प व बायझंटिन चित्रशैलीतील ख्रिस्ती अलंकरण, उभट उंच आकार व ठळक बाह्यरेषा यांचा मिलाफ या वस्त्रांवरील नक्षीत झाला. पंख असलेले सिंह, इतर पशू व चित्रविचित्र आकारांचे प्राणी, पानाफुलांचे आलंकारिक आकार, भावदर्शी टपोरे डोळे असलेले चेहरे व उंच मानवाकृती हे आकार दिसू लागले. सुंदर वीण व झगझगीत रंगसंगती यांमुळे ही वस्त्रे पाश्चात्य देशांत लोकप्रिय झाली. ईजिप्शियन कबरी व पश्चिमेकडील रोमन साम्राज्यातील अनेक चर्चचे संग्रह यांत बायझंटिन वस्त्रांचे जतन केलेले नमुने आढळले आहेत. शार्लमेन राजाच्या कबरीतही अशी वस्त्रे आढळली आहेत.
 
बायझंटिन वस्त्रांवरील आकारांत पानाफुलांचे पौर्वात्य अलंकरण, सपाट रंग व ग्रीक पद्धतींच्या पिळदार देहाच्या मानवाकृती यांचा मिलाफ झाला. याचे सुंदर उदाहरण प्रसिद्ध सॅमसन सिल्क आणि क्वाड्रिगा सिल्क या उल्लेखनीय वस्त्रांत दिसते. रंगसंगतीत लाल अगर जांभळ्या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी, पिवळा, काळा, पांढरा वगैरे रंगांचे अलंकरण नक्षीत दिसते. झगझगीत रंगसंगती, सुसंवादी रचना आणि कलात्मक आकार हे या वस्त्रांचे वैशिष्ट्य मानले गेले.
६३,६६५

संपादने