"रेल्वे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1335255 by ज on 2015-05-24T12:38:07Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
घुमान संमेलनाच्या परतीच्या प्रवासादरम्यान रेल्वेतील असुविधा, उद्विग्नतेला वाट करून देण्यासाठी उपरोधिक भावनेतून साहित्यप्रेमींनी ५ ते ७ एप्रिल २०१५ या काळात धावत्या '''रेल्वेतील पहिले मराठी साहित्य संमेलन''' 'साजरे' केले. या संमेलनात घुमान संमेलनाने काय दिले याचे ऑडिट परखडपणे करण्यात आले.
 
तसेच, संमेलन झाल्यानंतर सर्वसामान्य साहित्यरसिक अखिल भारतीय साहित्य महामंडळ, संयोजक संस्था आणि राज्य सरकारकडून वार्‍यावर कसे सोडले जातात, याचाही आँखोऑंखो देखा हाल या ६० तासांहून अधिक काळ रखडलेल्या रेल्वे प्रवासातून आला.
 
साहित्य रसिकांसाठीच्या सोयींमधील निष्काळजीपणाच्या निषेधार्थ उद्विग्न आणि उपरोधिक भावनेतून घेण्यात आलेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय मयेकर व तानाजी दिवेकर निमंत्रक होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. [[हरी नरके]] संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ कवी [[अशोक नायगावकर]] यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. टाळ-मृदंग-अभंगाच्या गजरात काढण्यात आलेली ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, कवी संमेलन, परिसंवाद, अध्यक्षीय भाषण असे सर्वकाही या संमेलनात होते.