"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १८८:
बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. [[बौद्ध विहार]] व [[बौद्ध मठ]] यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध [[भिक्खू]] हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. [[तक्षशिला]] व [[नालंदा]] या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. [[नालंदा]] हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.
* '''भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार'''
बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. [[श्रीलंका]], [[चीन]], [[जपान]], [[थायलंड]], [[म्यानमार]], [[भूतान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]], [[लाओस]], [[कंबोडिया]], [[सिंगापूर]], [[मंगोलिया]], [[तैवान]], [[हाँगकाँगहॉंगकॉंग]] इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
* '''आर्थिक विकासाला प्रोत्साहन'''
बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती [[सम्राट अशोक]] महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता.