"यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1746160 by Sandesh9822 on 2020-03-20T11:20:14Z
ओळ ३५:
 
== स्मारके ==
भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्‌घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. [[चवदार तळे]] येथे क्रांतीचे स्मारक व जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी BMS(?)कडे ४० बाय ४० ची जागा मागितली, BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली. जोपर्यंत [[शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन]] आणि [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]] हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बॅंकेसमोरबँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बॅंकेतबँकेत भरणा करावा म्हणून भैय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले. १९६६ साली बाबासाहेबांची ७५वी जयंती येत असल्यामुळे हा 'अमृत महोत्सव' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भैय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक 'भीमज्योत' [[महू]]हून [[मुंबई]]ला आणण्याचे ठरविले. २७ मार्च १९६६ रोजी ही भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री [[जगजीवनराम]] यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार [[दादासाहेब गायकवाड]] होते. भीम-ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर(?), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(?), पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, [[राजगृह]]ावरून दादरच्या चैत्यभूमीला आणण्यात आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.
 
== धार्मिक कार्य ==