"शतपत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1639440 by ज on 2018-11-09T17:01:17Z
ओळ २६:
 
==विद्येमुळेच स्वातंत्र्य==
लोक अज्ञान सोडून नवीन विद्या शिकले की भारताला स्वातंत्र्य मिळेल असे लोकहिवादींना वाटत होते. त्याविषयी ते ५४ व्या पत्रात लिहितात, ‘आता हिंदू लोकांनी उघड पाहावें की, आम्ही श्रेष्ठ की दुसऱ्या देशाचे लोक श्रेष्ठ. ग्रंथांवरून पहावें व लोकांचे तोंडून एकावेएकावॆ तेव्हां समक्ष भेट झाली तरचासगलें कीं नाहीं याचा विचार पहावा. तेव्हां साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहूत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांचीं मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापरधंदा कसा करावा हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणांत होत नहीं, तीस पुष्कळ विलंब लागतो. लहानमुलांस शहाणे होण्यास दाहवीस वर्षे लागतात, मग हा देश चांगला होण्यास दोनचारशें वर्षे लागतील. तोपर्यंत या लोकांस दुःख आहे परंतु त्यास उपाय नाहीं. जशी शाळेमध्ये मुलांनीं शिक्षा घेतली पाहिजे तद्वत् हें आहे. यापासून उत्तम फळ पुढें होईल. ...... धर्मामध्ये अध्रमाची भेसळ झाली आहे, त्यास लोक अधर्म म्हणतात. ते मात्र ज्ञानचक्षू आल्यावर जाईल. वर्ण जे आहेत ते स्वाभावीक सृष्टींत आहेत. म्हणजे कोणतेही देशांत वर्ण नाहींत असे नाही. वर्ण म्हणजे इतकेंच की, चार प्रकारचे व्यापार. ते स्रव देशांत नेहमी असावयाचेच. मात्र हल्लीं जो वर्णसंकर आहे म्हणजे वास्तवीक ब्राह्मण नसतां ब्राह्मण म्हणवितात, शूद्र असतां ब्राह्मण म्हणवितातव ब्राह्मण नसतां ब्राह्मण म्हणत नाहीत. हा वर्णसंकर मात्र जाईल आणि व्यवस्थित होईल....... लोक शहाणे जाले म्हणजे इंग्रजांस म्हणतील कीं, तुम्हांसारखेच आम्ही शहाणे आहों. मग आम्हांस अधिकार कां नसावे? मग हिंदू लोकांचे असे बहुमत पडले म्हणजे सरकारास देणं अगत्य आहे. इकडील लोक राज्याचा करभार चांगला करूं लागले, लांच कावयाचें सोडून दिलें म्हणजे मोठाली कामें गर्व्हनरराचीं सुद्धां त्यांचे हातीं येतील. आणि आपले लोक पार्लमेंट व स्वराज्य भोगतील – वगैरे असे होईल यांस संशय नाहीं.’<br>
अर्थातच लोकहितवादींना ज्या प्रकारे इंग्रज हे मुळात चांगले आहेत आणि भारत देशाचे भले करण्याकरिता आले आहेत असे वाटत होते आण त्यांच्या चांगुलपणावर समाजसुधारकांचा विश्वास होता. त्यामुळे आपले लोक शहाणे झाले की इंग्रज आपणहून स्वातंत्र्य देतील असे त्यांना वाटत होते. ते मात्र खरे नव्हते. इंग्रज केवळ भारतीय समाजाला शहाणे करण्याकरता आले नसून राज्य करण्याकरता आले होते. भारतीयांनी इंग्रजांनी आणलेले नवीन विषय शिकल्यामुळे स्वातंत्र्य मिळाले नसले तरी शिकल्याचा, नवीन यंत्र, तंत्रज्ञान समजून घेतल्याचा भारतीय लोकांना उपयोग झाला हे निश्चित.
"https://mr.wikipedia.org/wiki/शतपत्रे" पासून हुडकले