"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८६:
 
==कुपोषणावरील उपचार==
<p>'''रक्तपांढरी (ऍनिमिया)''' - भारतात शाळापूर्व वयोगटातील ६०% पेक्षा जास्त बालकांमध्ये रक्तपांढरीची लक्षणे आढळतात. रक्तातील लालपणा व प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता तांबड्या पेशींवर अवलंबून असते. तांबड्या पेशींचा लालरंग हा हिमोग्लोबिन या रक्तद्रव्यावर अवलंबून असतो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, “ब” आणि “क” जीवनसत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे दैनंदिन आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे रक्तपांढरी हा आजार होतो.
या शिवाय आव, जंत इत्यादी कारणांनी रक्तस्त्राव झाल्यास, वारंवार मलेरिया झाल्यास रक्तपांढरी हा आजार होऊ शकते.बाळाच्या शरीरात ६ महिने पुरेल इतके लोह असते, त्यामुळे ६ महिन्यापर्यंतच्या बालकांमध्ये सहसा हा आजार दिसत नाही. दुधात लोह क्षार व “क” जीवनसत्वाची कमतरता असते. ६ महिन्यांनी बाळाला वरचे पोषक अन्न सुरु केले नाही तर शरीरातील लोहाचा साठा कमी होतो.बाळाच्या आईला रक्तपांढरी झाली असेल तरी देखील बाळामध्ये हि लक्षणे दिसून येतात. </p>
*'''रक्तपंढरीची लक्षणे''' : बाळ माती खायला सुरवात करते, भूक मंदावते, चेहरा निस्तेज होतो, नखांवर पांढरेपणा जाणवतो. यामुळे बाळ वारंवार आजारी पडते.
<p>लिंबूवर्गीय फळांमध्ये “क” जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा इत्यादी लिंबू वर्गीय फळे खाल्ल्याने “क” जीवनसत्व मिळते. “क” जीवनसत्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.
</p>
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले