"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: बांधणी
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
रामकृष्णबुवांचा जन्म २८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ रोजी गोव्याच्या सीमेनजीक महाराष्ट्रात आताच्या दोडामार्ग तालुक्यातील वझरे या गावी झाला. हे गाव तेव्हाच्या [[सावंतवाडी संस्थान|सावंतवाडी संस्थानात]] होते. दहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने मोलमजुरी करून मुलाचे पालनपोषण केले. रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते [[मालवण]] येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. संगीत शिकणे हे एकच ध्येय घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी बुवांनी घर सोडले.
 
घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी [[पुणे|पुण्याला]] गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी [[मुंबई]], [[इंदूर]], [[उज्जैन]], [[वाराणसी]] असा त्यांचा प्रवास चालू राहिला. [[ग्वाल्हेर]] येथे उस्ताद निसार हुसेन खाँखॉं यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ [[जयपूर]] येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँखॉं यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनीखॉंसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. मध्यंतरी [[वाराणसी]] येथे त्यांना [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांच्या]] सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. [[नेपाळ]]मध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले.
 
== सांगीतिक कारकीर्द ==