"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
===मासिक पाळीचे चक्र===
मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो.
रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरु राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टँपनटॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणार्‍या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही.
मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व [[बीजांडकोश]] (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते.