"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
चित्त्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेहऱ्यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्त्याचे ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे [[बिबट्या]] आणि चित्त्यामध्ये लोक नेहेमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फरक आहे. चित्त्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात. चित्त्याचे ठिपके हे २ ते ३ सें.मी. व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्त्याच्या चेहऱ्यावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोघांमध्ये बराच फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्त्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते. चित्त्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक व लवचीक असतात. चित्त्याचे वजन साधारणपणे ४० किलोग्रॅमपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मीटरपर्यंत भरते. चित्त्याची शेपटी साधारणपणे ८४ सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नख्या. चित्त्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पूर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर व अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पूर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फायदा चित्याला अतिवेग घेण्यास झालेला आहे.
 
चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पँथेरापॅंथेरा उपकुळात येत नाही. त्याचे कारण चित्त्याला डरकाळी फोडता येत नाही, तसेच गुरगुरता देखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.
 
अतिवेगासाठी सक्षम होण्यास चित्त्यामध्ये मोठ्या नाकपुड्या, मोठी [[फुप्फुस|फुप्फुसे]] व वेगाने पळू शकणारे हृदय विकसित झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले