"गंमत जंमत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६४:
पण हताश न होता ते आता एखाद्या श्रीमंताच्या कॉलेजवयीन कन्यकेला पळवून आणायचा प्लॅन रचतात. गौतमची पूर्वी एकदा एका श्रीमंत मुलीशी शब्दिक चकमक झालेलीच असते. तेव्हा त्याच म्हणजे उद्योगपती दादासाहेब कोरेडे यांची एकुलती एक मुलगी कल्पना हिला पळवून न्यायचा बेत ते दोघेही ठरवतात व बदल्यात तिच्या वडलांकडे १ लाख रुपयांची रक्कम मागायची असे ठरवतात.
 
ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडीलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणाऱ्या गौतम आणि फाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरँगबूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणे त्यामुळे सहजशक्य होते. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरुन त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेवहढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचे काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात.
 
दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फाल्गुनकडून स्वतःची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलिस इन्स्पेक्टर किंवा फाल्गुनच्या शोधात आलेली आश्विनी इत्यादिं व्यक्ती जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करून वेळ मारून नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे, असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघेही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्र येते. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गंमत_जंमत" पासून हुडकले